घरक्राइमभंडारा अश्लील डान्स व्हिडीओ प्रकरण : अजित पवार गटाच्या सभापतीची दौलतजादा; 7...

भंडारा अश्लील डान्स व्हिडीओ प्रकरण : अजित पवार गटाच्या सभापतीची दौलतजादा; 7 जणांवर गुन्हे

Subscribe

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही गावातील एका कार्यक्रमातील अश्लील डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या डान्स प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या डान्स प्रकरणाला एक वेगळे वळण आले आहे. या डान्स प्रकरणी एका सभापतींने पैशाची उधळण केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली होती. यात अजित पवार गटाचे मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात रितेस वासनिक यांनी भंडारा जिल्ह्यातील गावातील एका कार्यक्रमात अश्लील डान्स करणाऱ्या नृत्यांगनावर पैशाची उधळण केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणार आहे. या प्रकरणी वरठी पोलिसांनी सभापती रितेस वासनिक यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांना संपूर्ण प्रकरणची सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – भंडाऱ्यातील अश्लील डान्सचा व्हिडीओ व्हायरल; दोन पोलीस कर्मचारी निलंबित

नेमके काय आहे प्रकरण ?

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यमधील नाकाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबरवाही येथे मंडई निमित्ताने एका कार्यक्रमाचे 17 नोव्हेंबरला आयोजन केले होते. या कार्यक्रमात विवस्त्रावस्थेतील अश्लील डान्स करण्यात आला. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात गोबरवाही पोलिसांनी नागपूरच्या आरके डान्स हंगामा ग्रुपच्या तीन जणांसह आयोजकांना आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 353, 354 ब, 294 आणि 509भांदवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कार्यक्रमादरम्यान दोन पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पण त्या कार्यक्रमातील अश्लील डान्स न थांबविल्या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तापस हा भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -