घरमहाराष्ट्रभाजपचे शिष्टमंडळ आज राजभवनावर

भाजपचे शिष्टमंडळ आज राजभवनावर

Subscribe

तब्बल १४ दिवसांच्या राजकीय कोंडीनंतर भाजपचे शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांना भेटणार आहे. तशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यात महायुतीचेच सरकार येणार असून चंद्रकांत पाटील आणि मी राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीची माहिती देऊ असे मनुगंटीवार यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे राज्यातील सरकार स्थापनेच्या हालचालींना गुरुवारपासून वेग येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. तुम्ही थोडा संयम ठेवा. तुम्हाला गोड बातमी लवकरच मिळेल. गुरुवारी आम्ही राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहोत. त्यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाईल. त्यानंतर महायुतीच्या फॉर्म्युल्याची माहिती मीडियाला दिली जाईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्यपालांना भेटल्यानंतर उद्याच सर्व गोष्टींचा उलगडा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

निवडणुका होऊन १३ दिवस उलटल्यानंतर उद्या पहिल्यांदाच भाजपचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेशी सत्ता स्थापनेबाबतची कोणतीही चर्चा झालेली नसताना भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नसणार आहे. शिवाय राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. सत्तेचा दावा सादर केला जाणार नसल्याचे संकेत मुनगंटीवार यांनी दिल्यानेही या भेटीला विशेष महत्त्वप्राप्त झाले आहे.

नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड
येत्या ३१ डिसेंबरपर्यंत राज्यात नव्या भाजप प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या पदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात येणार हे निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचा पराभव चंद्रकांत पाटील यांच्या चांगलाच अंगलट येणार आहे. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याचे निश्चित झाल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -