घरमुंबईमुंबईत येणार उस्ताद रोबोट 2.0

मुंबईत येणार उस्ताद रोबोट 2.0

Subscribe

लोकलची दुरुस्ती झटपट

गेल्या वर्षी रजनीकांतचा ‘2.0’ हा रोबोवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अनेकांना पसंत पडला होता. त्याचवेळी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता अखिलेश चौबे या अभियंंत्याने रेल्वेसाठी एक रोबो तयार केला होता. या रोबोला ‘उस्ताद’ असे नाव देण्यात आले होते. मात्र प्रायोगिकतत्वावर तयार करण्यात आलेल्या रोबोट मध्ये अनेक अडथळे येत होत्या. त्यामुळे उस्ताद रोबो नागपूरचा कारशेडमध्ये धुळखात पडला होता. मात्र मोठ्या परिश्रमाने या रोबोट मध्ये अनेक बदल करून त्याला अद्ययावत करण्यात आले आहे. या रोबोट ची चाचणीतसुध्दा यशस्वी झाली असून लवकरच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात उस्ताद रोबोट दाखल होणार आहे. त्यामुळे लोकल गाड्यांची दुरुस्ती लवकर होणार आहे.

रेल्वेच्या डब्यांच्या दुरुस्तीच्या कामात मानवी हस्तेक्षप कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाकडून एक रोबोट विकसित करण्यात आलेला होता. हा रोबोट मध्य रेल्वेच्या गाड्यांची देखभाल करण्यासाठी त्या कारखान्यात पीटलाइनवर उभा करण्यात आला होता. पूर्वीपासून जमिनीतील खड्ड्यांमध्ये उतरून रेल्वे कर्मचारी गाड्यांच्या खालील भागाची देखभाल आणि दुरुस्ती करत होते. हे काम करण्यापूर्वी आता रोबोटच खाली जाऊन गाड्यांची पाहणी करून कर्मचार्‍यांना मदत करत होता.

- Advertisement -

हा उस्ताद रोबोट गाडीच्या चाकापासून ते डब्याच्या आतील व बाहेरील कानाकोपर्‍यात छायाचित्रे आणि चित्रफिती उपलब्ध करीत होता. पुढे नियंत्रण कक्षातून त्यांच्यावर नियंत्रण ठेवून दुरुस्तीच्या कामात त्याची मदत होत होती. असा प्रयोग करणारे नागपूर रेल्वे स्थानकात देशातील पहिले रेल्वे स्थानक ठरले आहे. मात्र हा प्रायोगिक तत्त्वावरील रोबोट पावसाळ्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे काही महिने नागपूर कारशेडमध्ये धुळखात होता.

रोबोला २ लाखाचा खर्च
अभियंता अखिलेश चौबे यांनी या उस्ताद रोबोट मध्ये येणार्‍या तांत्रिक अडचणी दूर करुन त्याला अद्ययावत केले. उस्तादमध्ये एचडी कॅमेर्‍यासह विविध सेंसर लावण्यात आलेले आहेत. एचडी कॅमेर्‍यामुळे डब्याच्या आतील भागाचे छायाचित्रण आणि व्हिडिओ वायफायच्या माध्यमातून नियंत्रण कक्षात पाहता येतात. नियंत्रण कक्षातील अभियंते अँड्रॉइड अ‍ॅपच्या मदतीने कॅमेर्‍याला कोणत्याही ठिकाणी सेट करू शकतात. तसेच प्राप्त छायाचित्र मोठे करून पाहू शकतात. विशेष म्हणजे या रोबोला आता वॉटरफ्रुप करण्यात आले आहे. त्यामुळे तो पाण्यात उतरून काम करु शकेल. हा रोबोट बनवण्यासाठी 2 लाख रुपये खर्च आला आहे.

- Advertisement -

भारतीय रेल्वेतील पहिलाच प्रयोग
रोबोच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास तो स्वतः आपला मार्ग बदलू शकतो. रोबो गाडीच्या चाकाची स्थितीदेखील पाहू शकतो. मॅन्युअल मोड आणि ऑटो मोड आणि अडथळा प्रतिबंधक यंत्रणेने सुसज्ज आहे. हे तंत्रज्ञान सुरक्षिततेबाबत महत्वाचे पाऊल ठरू शकते. अशा प्रकारचा हा देशातील पहिला प्रयोग आहे.

उस्तादची वैशिष्ठ्ये
* अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप नियंत्रित
*वायफायद्वारे नियंत्रित
* हाय डेफिनेशनचे कॅमेरे
* उच्च दर्जाचे सेंसर
* वॉटरफ्रुफ स्टिम
* बुलोथोची व्यवस्था
* रोबोट ला प्रकाशासाठी टॉर्च
* मॅन्युअल मोड आणि ऑटो मोड

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामधील मेकॅनिकल इंजिनीअरने ‘उस्ताद’ नावाचा रोबोट विकसित केला आहे. त्याचा फायदा मध्य रेल्वेला नक्कीच होणार आहे. या रोबोमधील तांत्रिक अडचणी दूर करुन या रोबोटला अद्ययावत करण्यात आले आहे.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -