घरCORONA UPDATEमहाराष्ट्रात शिक्षणाचा 'गोंधळात गोंधळ'; आमदार आशिष शेलार यांचा सरकारला टोला

महाराष्ट्रात शिक्षणाचा ‘गोंधळात गोंधळ’; आमदार आशिष शेलार यांचा सरकारला टोला

Subscribe

मुख्यमंत्री म्हणतात, परिक्षांपेक्षा शिक्षण महत्त्वाचे पण शाळा कशा व कधी सुरु होणार? माहित नाही. मुख्यमंत्री जाहीर करतात, अंतिम वर्षे पदवी परिक्षा रद्द, पण अद्याप लेखी आदेश नाही. त्यामुळे विद्यापीठांत परिक्षांची तयारी सुरु. शिक्षणाचा महाराष्ट्रात असा गोंधळात गोंधळ, अशा शब्दात भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत सरकारला टोला लगावला आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत यासंबंधी आपले मत व्यक्त केले आहे.

काय म्हणाले आशिष शेलार

मुख्यमंत्री परिक्षा रद्द केल्याचे जाहीर करतात तर वैद्यकीय शिक्षणमंत्री परिक्षा घ्या, म्हणून राज्यपालांना जाऊन भेटतात…बार कौन्सिल ऑफ इंडिया म्हणते परिक्षा घ्यावीच लागेल. कुलपती म्हणून मा.राज्यपालांना काहीच अवगत केले जात नाही. पदवी अंतिम वर्षाला सरासरीवर गुण देऊन तब्बल ४० टक्के म्हणजे ATKT असलेल्या ३ लाख ४१ हजार ३०८ विद्यार्थी नापास करण्याचे हे षडयंत्र? तरुणांची एक पिढी उध्वस्त करण्याचे हे षडयंत्र? उच्च शिक्षणमंत्री म्हणतात योग्य वेळी निर्णय घेऊ? कोरोनामुळे भयभीत विद्यार्थी, पालकांचा धोक्यात आलेला नोकरी-धंदा. त्यात सरकारचा “गोंधळात गोंधळ”. दुर्दैवाने विद्यार्थी तणावात, असे ट्विट त्यांनी केले आहे.

- Advertisement -

आता तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी “सरकारचे संकटमोचन” खासदार संजय राऊत तुम्हीच धावून या. चला तरुणांचे भविष्य वाचवू या, अन्यथा संघर्ष करावाच लागेल, असे म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेचे नेता संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली.

हेही वाचा –

कोरोना राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वरही पोहोचला, पण पराभूत होऊन परतला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -