घरताज्या घडामोडीहे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी? -अतुल भातखळकरांचा सरकारला...

हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी? -अतुल भातखळकरांचा सरकारला सवाल

Subscribe

भाजपने सरकारला घेरले असून हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी? असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टि्वटमध्ये करत महाविकास आघाडीतील सावळ्या गोंधळावरच टीका केली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ऐनवेळी एमपीएससीच्या पूर्व परिक्षेची तारीख बदलण्यात आली. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर व नागपूरमध्ये आंदोलन केले होते.  त्यानंतर विरोधकांनीही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात उडी घेत सरकारची पुरती गोची केली. यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत परीक्षा आठ दिवसात होईल असे जाहीर केले. पण त्यावरही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे अखेर आज शुक्रवारी एमपीएससीची परीक्षा २१ मार्चला होणार असे जाहीर करण्यात आले. पण या सगळ्या गोंधळात भाजपने सरकारला घेरले असून हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी? असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टि्वटमध्ये करत महाविकास आघाडीतील सावळ्या गोंधळावरच टीका केली आहे.

त्याचबरोबर एमपीएससी परीक्षेच्या तारखांबद्दल बोलताना मंत्री वडेट्टीवर यांनी माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्याचाही भातखळकरांनी समाचार घेतला. राज्यातले सचिव मंत्र्यानाही जुमानत नाहीत का एवढं दुबळ सरकार आहे का .हे राज्य कोण चालवतं आहे महाविकासआघाडी ती सचिव मंडळी असा सवाल केला आहे.

- Advertisement -

एल्गार परिषदेत हिंदू विरोधी विधान करणाऱा शरजिल उस्मानी पुण्यात येऊन गेला. पण त्याबद्दल सरकारला माहित नाही. यावरही भातखळकर यांनी सरकारला फैलावर घेतले आहे. शरजिल उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे सिद्ध झाल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -