घरमहाराष्ट्रटीम देवेेंद्र अपक्षांच्या संपर्कात

टीम देवेेंद्र अपक्षांच्या संपर्कात

Subscribe

बहुमतापासून दूर राहण्याची भाजपला भीती

राज्यात पुन्हा एकदा भाजप -शिवसेना महायुतीचे सरकार येण्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलने वर्तवला असला तरी बहुमतासाठी आवश्यक 14५ आमदारांचे संख्याबळ भाजप स्वबळावर गाठण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथला जाण्याअगोदर आपल्या विश्वासू शिलेदारांच्या खांद्यावर टाकलेली, अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांना गळाला लावण्याच्या रणनितीची बुधवारी रात्री उशीरापर्यंत माहिती घेतल्याचे विश्वसनीयरित्या समजते.

मिळालेल्या माहिती-नुसार सुमारे डझनभर अपक्ष आणि बंडखोर संभाव्य निवडून येणार्‍या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय आमदारांशी आणि पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करुन आम्ही फडणवीस यांच्यासोबत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मुंबई महानगर प्रदेशमधील एका पक्षाच्या अध्यक्षानेही आपण भाजप सरकारसोबतच राहणार असल्याचे आश्वासन दिल्याचे भाजपच्या एका नेत्याने ‘आपलं महानगर’ला बुधवारी रात्री सांगितले.

- Advertisement -

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -