घरमहाराष्ट्रबोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!

बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!

Subscribe

१० वी ३ मार्चला , १२वी१८ फेब्रुवारीला

फेब्रुवारी -मार्च 2020 मध्ये होणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) च्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंगळवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 दरम्यान होणार आहे.

- Advertisement -

तर दहावीची परीक्षा 3 ते 23 मार्च 2020 दरम्यान होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखाबाबत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांना प्रतीक्षा असते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे व त्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हे वेळापत्रक जाहीर केल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली. परीक्षेपूर्वी शाळा आणि ज्युनियर कॉलेजकडे छापील स्वरूपात पाठवण्यात येणारे वेळापत्रक हे अंतिम असणार आहे, असे मंडळाकडून जाहीर करण्यात आले. संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यबरोबरच प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी-तोंडी परीक्षा किंवा इतर विषयांचे वेळापत्रक शाळा आणि ज्युनियर कॉलेजांना स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद केले आहे. परीक्षेच्या तारखांवर कोणाला आक्षेप असल्यास १५ दिवसांत त्यासंदर्भातल्या तक्रारी मंडळाकडे करण्यात याव्यात, असेही मंडळाकडून स्पष्ट केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप वेळापत्रकावर विश्वास ठेऊ नका
व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणार्‍या वेळापत्रकांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. परीक्षांची अनेक वेळापत्रके व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर सोशल मीडियावरून व्हायरल होतात. मात्र, या वेळापत्रकांवर विश्वास न ठेवता मंडळाकडून छापील स्वरूपात शाळा आणि ज्युनियर कॉलेजांना पाठवण्यात येणार्‍या वेळापत्रकानुसार तारखा पडताळून घ्यावे, असे आवाहन मंडळाने पत्रकाद्वारे केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -