घरक्रीडाक्रिस्तिआनो रोनाल्डोचे ७०० गोल

क्रिस्तिआनो रोनाल्डोचे ७०० गोल

Subscribe

पोर्तुगालच्या संघाला युएफा युरो पात्रता फेरीच्या सामन्यात युक्रेनने पराभवाचा धक्का दिला. युक्रेनने हा सामना २-१ असा जिंकला. पोर्तुगालचा संघ २-० असा पिछाडीवर असताना कर्णधार आणि महान खेळाडू क्रिस्तिआनो रोनाल्डोने पेनल्टीवर गोल केला. हा त्याचा कारकिर्दीतील ७०० वा गोल होता. व्यावसायिक फुटबॉल व आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये मिळून ७०० किंवा त्यापेक्षा जास्त गोल करणारा रोनाल्डो हा सहावा आणि पोर्तुगालचा पहिलाच खेळाडू आहे.

२००१ साली आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या रोनाल्डोने १०१० सामन्यांत ७०० गोलचा टप्पा गाठला. त्याने पोर्तुगालसाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ९५ गोल केले आहेत. तसेच व्यावसायिक फुटबॉलमध्ये त्याने स्पोर्टींग लिस्बनकडून खेळताना ५, मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना ११८, रियाल माद्रिदकडून खेळताना ४५० केले होते. सध्या इटालियन संघ ज्युव्हेंटसकडून खेळताना त्याच्या नावावर ३२ गोल आहेत.

- Advertisement -

फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणार्‍या खेळाडूंच्या यादीत जोसेफ बिकान असून त्यांनी ८०५ गोल केले होते. ब्राझीलचे रोमॅरिओ ७७२ गोलसह दुसर्‍या, तर पेले ७६७ गोलसह तिसर्‍या स्थानी आहेत. रोनाल्डोचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जाणारा लिओनेल मेस्सी सातव्या स्थानी असून त्याने ८८३ सामन्यांत ६११ गोल लगावले आहेत.

मी विक्रमांसाठी खेळत नाही -रोनाल्डो

- Advertisement -

७०० गोल केल्याविषयी क्रिस्तिआनो रोनाल्डो म्हणाला, मी विक्रम करण्यासाठी खेळत नाही, विक्रम माझ्याकडे पाहतात. मी केलेला हा विक्रम प्रत्येकजण करू शकत नाही. त्यामुळे मी संघातील सहकारी, मित्र, प्रशिक्षक, कुटुंब या सर्वांचे आभार मानतो. त्यांच्या पाठिंब्याशिवाय क्रिस्तिआनो रोनाल्डो घडू शकलो नसतो. माझ्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा क्षण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -