घरमहाराष्ट्रखेडमध्ये मानलेल्या बहिणीवर भावाने केला बलात्कार

खेडमध्ये मानलेल्या बहिणीवर भावाने केला बलात्कार

Subscribe

पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मानलेल्या बहिणीवर भावाने बलात्कार केला आहे. आरोपी भावासह त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये अल्पवयिन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीचा अश्लिल व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे समोर आले आहे. खेड तालुक्यातल्या कडूस येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन खेड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.

व्हिडिओ काढून केले ब्लॅकमेल

सख्ख्या बहिणीच्या मैत्रिणीला बहिणीचे नाते लावून संबंध जोडणाऱ्या नराधमानेच या मानलेल्या बहिणीवर बलात्कार केला आहे. १५ वर्षाच्या या पीडित मुलीसोबत आरोपी सचिन टोको याने सेल्फी फोटो काढले होते. हे सेल्फी फोटो सर्वांना दाखवू असे सांगून पीडित मुलीला भीती दाखवत आरोपीने गावाबाहेर शेतात नेऊन तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. तर आरोपी सचिनने मित्र मयूर टोके याच्या मदतीने त्याचा व्हिडिओ देखील तयार केला. या व्हिडिओच्या आधारे या मुलीला आरोपी ब्लॅकमेल करुन लागला. गावातील लोकांना आणि तुझ्या घरच्यांना हा व्हिडिओ दाखवेल अशी भिती दाखवत आरोपी तिच्यावर बलात्कार करत होता.

- Advertisement -

आरोपींच्या मुसक्या आवळल्या

या व्हिडिओची चर्चा पीडित मुलीच्या शाळेमध्ये होऊ लागल्यामुळे घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला. त्यानंतर याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सचिन टोके आणि मयूर टोके या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी खेड पोलिसांचा तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -