घरमहाराष्ट्रपुण्यात इमारतीची संरक्षण भिंत कोसळली; १७ मजूरांचा मृत्यू

पुण्यात इमारतीची संरक्षण भिंत कोसळली; १७ मजूरांचा मृत्यू

Subscribe

पुण्यामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. कोंढवा परिसरामध्ये इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बडा तलाब मस्जिद परिसरातील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षण भीत कोसळून ही धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री ही घटना घडली असून गाढ झोपेमध्ये असलेल्या मजूरांवर काळाचा घाला घातला आहे. बांधकामासाठी ४० ते ५० फूट खोल खोदकाम करण्यात आले होते. दरम्यान, अपघातातील मृतांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात प्रथम मृतांना ५ लाखांची मदत जाहीर केली. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय एनडीआरएफने मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

- Advertisement -

इमारतीची संरक्षण भिंत अचानक मजूरांच्या झोपड्डयांवर पडली. ढिगाऱ्याखाली दबून १७ मजूरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून बचावकार्य सुरु आहे. बचावकार्या दरम्यान तीन जणांना सुरक्षित बाहेर काढणयात आला एहा. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. मृत मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, पावसामुळे बचावकार्यामध्ये अडथळा येत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये दोषी असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, शहा, वोरा आणि गांधी हे तीन जण या प्रोजेक्टचे भागिदार असल्याची माहिती समोर येत आहे.

मृतांची नावे

१) मोहन शर्मा – २४ वर्ष
२) अमन शर्मा – १९ वर्ष
३) रवी शर्मा – १९ वर्ष
४) आलोक शर्मा – २८ वर्ष
५) अजितकुमार शर्मा – ७ वर्ष
६) रेखालकुमार शर्मा – ५ वर्ष
७) संगीता देवी – २६ वर्ष
८) नीवा देवी – ३० वर्ष
९) ओवी दास – २ वर्ष
१०) सोनाली दास – ६ वर्ष
११) भीमा दास – ३८ वर्ष
१२) लक्ष्मीकांत सहानी – ३३ वर्ष
१३) सुनील सिंग – ३५ वर्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -