घरमहाराष्ट्रखंडाळा घाटात बस कोसळली

खंडाळा घाटात बस कोसळली

Subscribe

5 मृतांमध्ये मुंबईतील तिघांचा समावेश

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बोरघाट उतरताना बस दरीत कोसळून ५ जण ठार झाले. सोमवारी पहाटे 4.30 वाजता खालापूर तालुक्याच्या हद्दीत गारमाळ नजिकच्या वळणावर ही दुर्घटना घडली. मृतांत ३ वर्षीय बालिकेचा समावेश असून, 4१ जखमींपैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बसच्या चालकाने मद्यपान केल्याचा आणि त्याला डुलकी लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बस चालक बद्रीनाथ पोपट गोसावी हा जखमी असून त्याला पनवेल येथील एमजीएम हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कराड (जि. सातारा) येथून 49 प्रवासी घेऊन ही खासगी बस मुंबईकडे निघाली होती. लोणावळा सोडल्यानंतर बोरघाट उतरताना वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्ता सोडून 20 फूट खोल वाटेतील झाडांवर आदळत गेली. गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये यामुळे एकच गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाला. या अपघातातात सर्वज्ञा सचिन थोरात (3, रा.कराड), स्नेहा जनार्दन पाटील (15, रा. घाटकोपर), संजय शिवाजी राक्षे (50, पवई, मुंबई), प्रमिला रामचंद्र मोहिते (50, रा. कराड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर जनार्दन रामचंद्र पाटील (45, घाटकोपर, मुंबई) यांचा पवना रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, देवदूत पथक, महामार्ग पोलीस आणि अपघातग्रस्त मदतीसाठीचे पथक घटनास्थळी तातडीने पोहचले आणि तात्काळ मदतकार्य सुरू झाले. गंभीर जखमींना खोपोली नगर परिषद रुग्णालय, कामोठे येथील एमजीएम रुग्णालय, पुणे जिल्ह्यातील सोमाटणे फाटा येथील पवना आणि तळेगावच्या लोकमान्य रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जखमी झालेल्यांची नावेः- बाजीराव दादाराव पाटील (40), इंदू भास्कर जाधव (55), गणेश परमेश्वर मेनन (47), रेवा जिवेश हलदर (48), मारुती नामदेव जाधव (40), बाजीराव रामचंद्र शेवाळे (50), सुनीता बाजीराव शेवाळे (40, रा.वाशी-नवी मुंबई), रामचंद्र लक्ष्मण जाधव (59, रा.विक्रोळी-मुंबई), संजय श्यामराव पाटील (41, रा.वाशी), वंदना शांताराम शिंदे (35), ओमकार शांताराम शिंदे (15, रा. कराड), जयेश वसंत पाटील (38, रा.शिराळा, जि. सांगली), उज्ज्वला सुधीर निकम (१9), आदित्य सुधीर निकम (11), दीपक श्यामराव यादव (43, रा.कांजूरमार्ग-मुंबई), रमेश यशवंत देसाई (43, रा. येवले-कराड), प्रतीक पाटील(रा. कराड), जय कुमार साळुंखे (13), ओमकार कुमार साळुंखे (9), सागर प्रताप घारे (रा. घणसोली, जि. ठाणे), प्राजक्ता सचिन थोरात (२३).

- Advertisement -

शंकुतला नथुराम तांबे (56, कराड), संजय नथुराम गंभिरे (45, रा.कराड), जयश्री जनार्दन पाटील (रा. घाटकोपर), अंकुश सीताराम मत्रे (25, मुंबई), भास्कर बाबूराव जाधव (63, रा. कोपरखैरणे), सत्पाल हनुमंतराव भगत (35), अमर कृष्णांत तुपगडे (48), सागर मदन सकपाळ, अविनाश शंकर यादव (27, रा. मुंबई), सुहास शिंदे, कांचन रमेश देसाई (40, कोपरखैरणे), जयेश पाटील (आजरी खुर्द, जि. सातारा), सागर शिवाजी शिंदे (रा.कटरे, जि. सातारा), वैभव अप्पासाहेब कदम (25, रा.कटरे), अमृता विवेक पाटील (22), विवेक भगवान पाटील (25, रा. नेरूळ), कविराज कृष्णा पाटील, लहू रघुनाथ मोरे (30) आणि विलास नामदेव कांबळे.

बस वेगात आपटत 15 ते 20 फूट खाली गेल्याने बसची आसने उखडली जाऊन एकमेकांवर आदळून प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी झाले. दूरचा आणि रात्रीचा प्रवास असल्याने या बसवर दोन चालक होते. चालकाने मद्यपान केल्याचे बसमधील प्रवाशांचे म्हणणे आहे. पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी लागल्यानंतर नियंत्रण जाऊन हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघात घडला त्या ठिकाणी वळणावर रस्त्यालगत लोखंडी पट्टी, संरक्षक कठडा गरजेचे आहे जेणेकरून अपघाताची तीव्रता कमी झाली असती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -