घरमहाराष्ट्र१४ जूनला मंत्रिमंडळ विस्तार

१४ जूनला मंत्रिमंडळ विस्तार

Subscribe

राधाकृष्ण विखे-पाटील, रणजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: संकेत दिले होते, मात्र तारीख गुलदस्त्यात ठेवली होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार नेमका केव्हा होणार, कोणाची वर्णी लागणार याविषयी तर्कवितर्क लावण्यात येऊ लागले. आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे मंगळवारी जाहीर केले. पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनपासून सुरू होत असून १४ जून रोजी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी चर्चा आता मंत्रालयात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच भाजपवासी झालेले रणजीतसिंह पाटलांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंद दाराआड मंगळवारी चर्चा केली.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून सध्याच्या राज्य सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या अधिवेशनात सरकार पूर्ण तयारीनिशी उतरण्याच्या विचारात आहे. याच पार्श्वर्भूमीवर पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे. आता यामध्ये कुणाची वर्णी लागणार आणि कुणाचे खाते जाणार? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील, रणजितसिंह पाटील, गिरीष महाजन हे देखील उपस्थित होते. तसेच, काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार, बंडखोर काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे मंत्रिमंडळातील संभाव्य नावांबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

आशिष शेलारांना मंत्रीपद
मुंबई महानगर पालिका निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईत भाजपच्या प्रचाराची धुरा एकहाती समर्थपणे सांभाळत जास्तीत जास्त जागा निवडून आणणार्‍या मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुडबुकमध्ये शेलार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मंत्रीमंडळ विस्तारामध्ये भाजपचे सहा तर शिवसेनेचे एक मंत्री शपथ घेतील.

शिवसेनेकडून दोन्ही क्षीरसागर?
शिवसेनेकडून बीडचे राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांचे नाव यादीत निश्चित झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या क्षिरसागर यांनी आमदारकीवर पाणी सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. तर मागच्यावेळी मंत्रिपदाला हुलकावणी देणार्‍या कोल्हापूरच्या राजेश क्षीरसागर यांचाही समावेश यावेळी होण्याची शक्यता आहे.मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी दोघांची नावे चर्चेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -