घरमुंबईस्मार्ट वॉचचा वापर टाळणा-या सफाई पर्यवेक्षकावर कारवाई

स्मार्ट वॉचचा वापर टाळणा-या सफाई पर्यवेक्षकावर कारवाई

Subscribe

घनकचरा व्यवस्थापन विभागात स्वच्छता अधिकारी, तसेच स्वच्छता निरीक्षकांसह कंत्राटी सफाई कामगारांनाही स्मार्ट बायोमॅट्रीक वॉच देण्यात आले असून त्यानुसार त्यांची हजेरी तपासण्यात येत आहे. यामध्ये बेलापूर विभागातील गट क्र. 17 मधील मे. राज कंस्ट्रक्शन या ठेकेदाराच्या चार सफाई कामगारांनी आपली बायोमॅट्रीक घड्याळे एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे या गटाच्या निरीक्षणाची जबाबदारी असणा-या पर्यवेक्षकाला कामावरून काढून टाकण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.

बायोमॅट्रीक स्मार्ट वॉचमुळे कंत्राटी कामगारांप्रमाणेच अधिका-यांचेही ठिकाण तसेच हालचालींची माहिती मुख्यालयातील नियंत्रण केंद्राला मिळत असल्याने कामाच्या वेळेत नेमून दिलेल्या ठिकाणीच उपस्थित असणे आवश्यक झाले आहे. केवळ कामाचे ठिकाणच नाही तर त्या व्यक्तीच्या प्रकृतीची माहिती देखील या स्मार्ट वॉचव्दारे समजत असून कर्मचारी किती वाजता कामावर आला, कोणत्या क्षेत्रात काम करीत आहे, किती वाजता कामावरून गेला अशी सर्वच प्रकारची इत्यंभूत माहिती या प्रणालीव्दारे उपलब्ध होत आहे.या बायोमॅट्रीक वॉचव्दारे कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी काम करतात व त्यांच्यावर कामाची वेळ पाळण्याचे नियंत्रण आलेले आहे. कार्यालयीन शिस्त व कामाच्या वेळेचा नेमून दिलेल्या कामासाठीच जास्तीत जास्त उपयोग याव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेची प्रतिमा नागरिकांच्या मनात उंचावण्यासाठी ही स्मार्ट वॉच संकल्पना उपयोगी ठरत आहे आणि महानगरपालिका कर्मचा-यांच्या मनातही आपल्या कामाविषयी आत्मियता वाढीस लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -