घरमहाराष्ट्रस्मृती इराणींवर वादग्रस्थ विधान करणाऱ्या जयदीप कवाडेवर गुन्हा दाखल

स्मृती इराणींवर वादग्रस्थ विधान करणाऱ्या जयदीप कवाडेवर गुन्हा दाखल

Subscribe

चौकशीत आणखी कोणी दोशी अढळल्यास त्याच्यावर देखील करावाई केली जाईल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या जयदीप कवाडे यांच्यावर केंद्राय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर वादग्रस्थ विधान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही या वादग्रस्थ विधानावर जयदीप कवाडे यांच्याविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, या तक्रारीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी चौकशी सुरु आहे. तपासामध्ये आणखी कोणी दोषी अढळल्यास कारवाई करण्यात येईल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रचाराची पातळी खालावली

वादग्रस्थ वक्यव्य करणारे जयदीप कवाडे हे आमदार जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजिव आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आहेत. दरम्यान, काँग्रसने नागपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचार सभेत त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विषयी वादग्रस्थ विधान केले होते. संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही असे विधान करत त्यांनी प्रचाराची पातळी खालच्या लेवलला नेली. त्यांनतर त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपकडून करण्यात आली होती.

- Advertisement -

नेमक काय म्हणाले कवाडे

निवडणूक म्हटलं की टीका, आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मात्र टीका करताना सर्वच पक्षातील नेत्यांना विशिष्ट मर्यादा पाळणे गरजेची असते. हे होताना काही दिसत नाही, असे काही घटनांवरून पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना एकेरी भाषेत त्यांनी ही स्मृती इराणीबाई कपाळावर मोठं कुंकू लावते. आम्ही याबाबत विचारलं असता आम्हाला कोणीतरी सांगितलं, जसे नवरे बदलतात तसंतस कुंकू मोठं होत जातं. ही नरेंद्र मोदीची मंत्री, नितीन गडकरीची मंत्री लोकसभेत बसून संविधान बदलायच्या भाषा करते. तेव्हा याच नाना पटोलेंनी भर लोकसभेत सांगितलं, स्मृती इराणी बाई संविधान बदलणे हे नवरा बदलण्याइतके सोपे नाही. कवाड यांच्या या विधानामुळे प्रचाराची पातळी भलतीच खाली येत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपचे दक्षिण अहमदनगर संघाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी अंतयात्रेत सहभागी होत चक्क मृतदेहा बरोबर काढलेला फोटो व्हायरल होत असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून टिका होत आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -