घरमहाराष्ट्र१५ दिवसांत आरक्षणाचा मुद्दा निकालात निघणार-मुख्यमंत्री

१५ दिवसांत आरक्षणाचा मुद्दा निकालात निघणार-मुख्यमंत्री

Subscribe

मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भातील सर्व चित्र स्पष्ट होईल. हा अहवाल १५ नोव्हेंबरला येणे अपेक्षीत होते त्याची पूर्तता झाली असून पुढच्या १५ दिवसात अहवालाची वैधनिक कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षापासून राज्यातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवरुन आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले आहेत. यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पंधरा दिवसात आरक्षणाचा मुद्दा निकालात घेणार असल्याचा दावा केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत राज्यसरकार नेहमीच सकारात्मक राहिले आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भातील सर्व चित्र स्पष्ट होईल. हा अहवाल १५ नोव्हेंबरला येणे अपेक्षीत होते त्याची पूर्तता झाली असून पुढच्या १५ दिवसात अहवालाची वैधनिक कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

१५ दिवसात आरक्षणाचा मुद्दा निकालात

अकोला जिल्ह्यामध्ये दुष्काळ आणि विविध विकासकामांच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री आज अकोल्यामध्ये होते. ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे पोहोचलेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भातील सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील १५ दिवसामध्ये मराठा आरक्षणा मुद्दा निकालात घेणार असल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

माध्यमांमध्ये पंतगबाजी सुरु

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालासंदर्भात माध्यमांमध्ये विविध चर्चा सुरु आहेत. अहवालात काय शिफारसी असतील याचा अंदाज घेताना अनेकांनी अहवालच हाती लागल्यासारखी मांडणी केली असून, ही केवळ पंतगबाजी आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटलेला नाही असा दावा त्यांनी केला. हा अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर त्यासदंर्भातील वैधानिक कार्यवाही पुर्ण करून तो अहवाल सार्वजनिक करायचा की नाही याबाबत निर्णय घेऊ असे ही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -