घरमहाराष्ट्रचिखलीतील पंचशील फिल्टर कंपनीला भीषण आग

चिखलीतील पंचशील फिल्टर कंपनीला भीषण आग

Subscribe

चिखलीतील पंचशील कंपनीला आग शार्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

पुण्याजवळच्या चिखलीमध्ये कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पंचशील फिल्टर कंपनीला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाचे ८ बंब आणि १२ खासगी टँकरच्या सहाय्याने आग विझवण्यात आली आहे. शार्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

अशी घडली घटना

अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी सांगितले की, कुदळवाडी चिखली येथील स्पाईस रोडवरील पंचशील फिल्टर्स या कंपनीला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. भोसरी, तळवडे, प्राधिकरण, चिखली, संत तुकारामनगर आणि पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग विझवली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -