घरमनोरंजनलग्न जाहीर करताच बनले Instagramचे सुपरस्टार

लग्न जाहीर करताच बनले Instagramचे सुपरस्टार

Subscribe

दीपिका-रणवीरने इंस्टाग्रामवरून दिलेल्या लग्नाच्या सुखद वृत्तानंतर, इंस्टावर या दोघांच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला आहे. 

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाविषयी गेल्या काही काळापासून जोरदार चर्चा रंगत होत्या. मात्र, सगळ्या चर्चांना आणि तर्क-वितर्कांना पूर्णविराम देत, अखेर दीपिका आणि रणवीरने आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली. दीपिका-रणवीर १४ आणि १५ नोव्हेंबरला लग्न करणार असल्याची बातमी त्यांनी इन्स्टाग्रामवरून जाहीर केली. या दोघांनीही आपल्या अधिकृत इनस्टाग्राम अकाउंटवरुन लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल केला. दरम्यान, या पोस्टमुळे रणवीर आणि दीपिका दोघंही इंस्टाग्रामवर ‘नंबर वन’ बनल्याचं वृत्त समोर आलं आहे. लग्नाची तारीख जाहीर केल्यानंतर या दोघांच्याही फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी- स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनूसार, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने १०० गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अग्रस्थानी आपली वर्णी लावली आहे. बॉलीवूडमधल्या या बहुचर्चित जोडीच्या लग्नाची वाट चाहते खूप काळापासून पाहत होते. दरम्यान, याच चाहत्यांना दीपिका-रणवीरने इंस्टाग्रामवरून दिलेल्या सुखद वृत्तानंतर इंस्टावर या दोघांच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला आहे.


वाचा: राखी सावंत तनुश्रीला म्हणते ‘चार आणा’ दे!

रणबीर-दीपिका इन्साटवर नंबर १

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, ‘दीपिका-रणवीरने इंस्टाग्रामवरून आपल्या लग्नाची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करोडो लोकांनी ही पोस्ट वाचली आणि ती लाइक आणि शेअरही केली. ज्यामुळे या दोघांच्या रँकिंगवर बराच मोठा फरक पडला.’ अश्वनी कौल पुढे सांगतात, ‘आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश असतो. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममूळे आम्हाला प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.’

- Advertisement -

याआधी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खानसुध्दा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इंस्टाग्राम रँकिंगमध्ये लोकप्रिय होते. तसंच, दीपिकाच्याआधी प्रियंका चोपड़ा, अनुष्का शर्मा, जैकलिन फर्नांडीज आणि सोनम कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इंस्टाग्राम रँकिंगवर पहिल्या पाच लोकप्रिय तारकांमध्ये होत्या.


वाचा: ‘सतरा’ पे ‘खतरा’, 8 महिन्यांची चिमुरडी संकटात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -