घरमहाराष्ट्र'खानदेशला आगामी पाच वर्षांत दुष्काळमुक्त करु'

‘खानदेशला आगामी पाच वर्षांत दुष्काळमुक्त करु’

Subscribe

'जनतेच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा विधानसभेवर झेंडा फडकवून आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू अशी स्थिती निर्माण करू', असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी धुळे जिल्ह्यात दौंडाईचा येथे जाहीर सभेत व्यक्त केला आहे.

जनतेच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा विधानसभेवर झेंडा फडकवून आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू आणि समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवून खानदेशाला कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही, अशी स्थिती निर्माण करू‘, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी धुळे जिल्ह्यात दौंडाईचा येथे जाहीर सभेत व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा गुरुवारी सुरू झाला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही

छत्रपती शिवरायांच्या आशिर्वादाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जनतेने पाच वर्षांपूर्वी सत्ता दिली. गेल्या पाच वर्षांत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात जलसंचय करण्यात आला. आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी काम करायचे आहे. समुद्रात वाहून जाणारे पश्चिमी वाहिनी नद्यांचे १६७ टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे आणणार आहोत. अक्कलपाडा, सुलवाडे जामफळ योजना, मेगा रिचार्ज यांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून खानदेशाला कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही, अशी स्थिती पाच वर्षांत निर्माण करायची आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या दौंडाईच्या सभेला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ. सुभाष भामरे, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर आणि भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरे ईडी नोटीस; खबरदार कायदा व सुव्यवस्था हातात घ्याल तर! – मुख्यमंत्री


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -