घरमुंबईकितीही चौकशा करा, माझं तोंड बंद होणार नाही - राज ठाकरे

कितीही चौकशा करा, माझं तोंड बंद होणार नाही – राज ठाकरे

Subscribe

तब्बल ९ तास चाललेल्या ईडीच्या चौकशीनंतर अखेर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले आणि मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अर्थात, ही सुटका तात्पुरती असून ईडी पुन्हा राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावू शकते. मात्र, ईडीच्या चौकशीतून बाहेर आल्यानंतर राज ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकर्त्यांना नवीन स्फुरण देणारी ठरली आहे. ईडी कार्यालयामधून बाहेर पडल्यानंतर कृष्णकुंजवर पोहोचल्यावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी बोलताना सगळं व्यवस्थित असल्याचं सांगितलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘अशा कितीही चौकशा केल्या, तरी माझं थोबाड बंद होणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी तुमच्याशी बोलेन’. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून अनेक तर्क लढवले जाऊ लागले आहेत. आपल्याला चौकशीच्या फेऱ्यात अडकवलं असून आपण बोलायचं थांबणार नाही, असा संकेत राज ठाकरेंना द्यायचा असल्याचं सागंतलं जात आहे. तसेच, योग्य वेळ आल्यावर तुमच्याशी बोलेन यामध्ये नक्की राज ठाकरे कधी बोलणार? याविषयीची उत्सुकता देखील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

उन्मेश जोशींच्या मालकीच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीपासून या घोटाळ्याची सुरुवात झाली. राज ठाकरे आणि राजन शिरोडकर कोहिनूस इमारत बांधकामात बरोबरीचे भागीदार होते. सार्वजनिक क्षेत्रातल्या आयएल अॅण्ड एफएस या कंपनीने कोहिनूर सीटीएनएल कंपनीत २२५ कोटींची गुंतवणूक केली होती. पण २००८मध्ये कंपनीने आणि राज ठाकरेंनी देखील आपले सर्व शेअर्स विकून कंपनीतून काढता पाय घेतला. त्यातून पुढे मोठा घोटाळा घडल्याचं समोर आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -