घरमहाराष्ट्रप्रवाशांना वेठीस धरणारे एसटी आंदोलन मागे घ्या

प्रवाशांना वेठीस धरणारे एसटी आंदोलन मागे घ्या

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एसटी कर्मचार्‍यांना आवाहन ,राजकारण करू नये

राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्व कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी एसटी कर्मचार्‍यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

एसटी कर्मचार्‍यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी राज्य सरकार मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील सरकारने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचेही समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

गरीब एसटी कर्मचार्‍यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसाराच्या होळ्यांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, अशी विनंतीही ठाकरे यांनी राजकीय पक्षांना केली आहे. शिवाय ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे.

एकूण ९१८ एसटी कर्मचारी निलंबित

गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांचा संप चांगलाच चिघळला असून राज्यभरातील २५० डेपोमधून बुधवारी एकही बस बाहेर पडली नाही. एसटीच्या बसेस शंभर टक्के बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागला आहे. परिणामी संपात सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांवर एसटी महामंडळाकडून मंगळवारपासून जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ९१८ एसटी कामगारांवर निलंबनाची कारवाई महामंडळाकडून करण्यात आली आहे. त्यापैकी मंगळवारी ३७६ तर बुधवारी ५४२ जणांचे निलंबन करण्यात आले आहे.

- Advertisement -

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. कोर्टाचे निर्देश असताना सुद्धा कामगार संपावर गेल्यामुळे मंगळवारपासून एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. काल एसटी महामंडळाकडून काल ३७६ तर आज ५४२ अशी आतापर्यंत ९१८ एसटी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाचा विलीनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या संपाचा आज १४ वा दिवस आहे.

कामगारांचा संप आता चांगलाच चिघळला असून आज राज्यातील २५० आगारांपैकी २५० आगार बंद होते. परिणामी काल एसटी महामंडळाकडून केलेल्या कारवाईमुळे संपात सहभागी होणारे कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले असून आज राज्यभरातील एसटी कर्मचार्‍यांनी मुंबईकडे वाट पकडली होती. मोठ्या प्रमाणात बुधवारी आझाद मैदानावर एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -