घरमहाराष्ट्रपुण्यात दहिहंडी फ्लेक्सवरुन झालेल्या वादात तरुणाची हत्या

पुण्यात दहिहंडी फ्लेक्सवरुन झालेल्या वादात तरुणाची हत्या

Subscribe

दहिहंडी सणा आधीच पुण्यामध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. दहिहंडीचा फ्लेक्स लावण्यावरु झालेल्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

दहिहंडी सणाचे फ्लेक्स लावण्यावरुन झालेल्या वादात पुण्यात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुण्याच्या सिंहगडमधील माणिकबाग परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपिंविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरुन वाद

पुण्यामध्ये सध्या दहीहंडी उत्सवाची तयारी जोरात सुरु आहे. दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन आणि शभेच्छांचे पोस्टर शहरामध्ये लावले जात आहे. याच पोस्टर लावण्यावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर हत्यामध्ये झाले असल्याचे पुण्यात समोर आले आहे. अक्षय गडशी या २३ वर्षाच्या तरुणाची निर्घृण हत्य करण्यात आली आहे. अक्षयचे त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या तरुणाशी दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरुन वाद झाला होता.

- Advertisement -

आरोपीविरोधात गुन्हे दाखल

मध्यरात्री ५ जणांनी अक्षयची निर्घृण हत्या केली. माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर तलवारीने वार करुन अक्षयची हत्या करण्यात आली. अक्षयच्या हत्येप्रकरणी निलेश चौधरी, सागर दारवडकर आणि त्याच्या तीन साथिदारांविरोधात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाचही आरोपींचा शोध पुणे पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -