घरमहाराष्ट्रसांगलीची जागा कोणाला द्यायची ते काँग्रेसने ठरवावे - जयंत पाटील

सांगलीची जागा कोणाला द्यायची ते काँग्रेसने ठरवावे – जयंत पाटील

Subscribe

सांगलीची जागा काँग्रेसला की स्वाभिमान शेतकरी संघटनेला द्यायची हा सध्या चर्चेचा विषय असून कोणाला कोणती जागा द्यायची हे काँग्रेसने ठरवावे, असे बोलत जयंत पाटील यांनी सांगलीच्या जागेच्या प्रश्नावर बोलणे टाळले आहे.

‘काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीत आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेच्या दोन जागा द्यायचे ठरले होते. आम्ही आमच्या वाट्याची हातकणंगलेची जागा त्यांना दिली आहे. आता काँग्रेसने त्यांना कोणती जागा द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे अमुकच जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्या, असे आम्ही काँग्रेसला सांगितले नाही,’ असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगलीच्या प्रश्नावर बोलणे टाळले आहे. खासदार शेट्टी यांच्या प्रचार सभेत येडेमच्छिंद्र येथे जयंत पाटील बोलत होते.

जयंत पाटलांनी बोलणे टाळले

सांगलीची जागा काँग्रेसला की स्वाभिमाना शेतकरी संघटनेला द्यायची हा सध्या चर्चेचा विषय आहे. याच पार्श्वभूमीवर आज खासदार शेट्टी यांची प्रचार सभा झाली. या सभेत जयंत पाटील यांनी सांगलीच्या प्रश्नावर जास्त बोलणे टाळले आहे. ‘आम्ही त्यांना जागा दिली आहे. काँग्रेसने त्यांच्या वाट्याची कोणती जागा द्यायची कोणाला द्यायची हे त्यांनी ठरवावे. सांगलीलाच द्या’, असे आम्ही सांगितलेले नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

वसंतदादांचा विचार हाच माझा पक्ष

‘आता माझा कोणताच पक्ष राहिलेला नाही आहे. वसंतदादांचा विचार हाच माझा पक्ष असेल. त्यामुळे उगाच गैरसमज नको म्हणून मी इथे आलो आहे. दादा बापू गटातील संघर्ष थांबविण्यासाठी जयंतराव आपण एकत्र येवूया. हा संघर्ष तुम्हालाच विधानसभेला अडचणीचा ठरणार आहे’, असे मत प्रतीक पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे. यावर विश्वजीत कदम यांनी ‘प्रतीक पाटील भावनाविवश होऊन घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि काँग्रेस पक्षाचेच क‍ाम करावे’, अशी म‍ाझी इच्छा असल्याचे म्हटले आहे.


वाचा – राजीव गांधी यांनीच विखे पाटलांना पाडण्यास सांगितले होते – जयंत पाटील

- Advertisement -

वाचा – …तरच भाजपला बारामती जिंकता येईल; जयंत पाटील यांनी सांगितला फॉर्म्युला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -