घरमुंबईकल्याणच्या २७ गावांची नाराजी शिवसेनेला भोवणार?

कल्याणच्या २७ गावांची नाराजी शिवसेनेला भोवणार?

Subscribe

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या २७ गावांचा प्रश्न बिकट होत असून त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असतानाच शेतक-यांच्या जमिनींवर टाकलेले आरक्षण आणि स्वतंत्र नगरपालिकेसाठी सुरू असलेला लढा यामुळे २७ गावातील जनता सत्ताधारी शिवसेना भाजपावर नाराज आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात हा परिसर येत असल्याने २७ गावांची नाराजी ही शिवसेनेला भोवणार असल्याचेच चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारांना कसं आकर्षित करायचं? असा मोठा पेच सत्ताधारी शिवसेना-भाजपसमोर उभा राहिला आहे.

आरक्षणामुळे स्थानिक नाराज

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतल्या २७ गावांपैकी १० गावांमध्ये ग्रोथ सेंटर आणि ५ गावांवर टीपी स्कीम (टाऊन प्लनिंग) अशा १५ गावांवर आरक्षण टाकलं आहे. १ हजार ८६ हेक्टरवर हे ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार असून त्यासाठी १ हजार ८९ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. मात्र, २७ गावांत हजारो एकर शेतजमीन आहे. ग्रोथ सेंटर आणि टीपी स्कीममध्ये शेतकऱ्यांची जमीन बाधित होत असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी संरक्षण खात्याने अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी विमानतळासाठी स्थानिक शेतकऱ्यांची जागा घेतली होती. मात्र, स्वातंत्र्यानंतरही त्या जागा परत न केल्याने भूमिपुत्रांनी हिंसक आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाला एक वर्ष झालंय. त्यामुळे सरकारविरोधात स्थानिक भूमीपुत्रांचा रोष वाढत आहे.

- Advertisement -

वाचा – कल्याणमध्ये भाजपच्या तर भिवंडीत सेनेच्या मदतीवर एकमेकांचे भवितव्य अवलंबून

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचं काय झालं?

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांच्या विकासासाठी जाहीर केलेले साडेसहा हजार कोटींचे पॅकेज आणि २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन यांची पूर्तता न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. तसेच २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून सर्वपक्षीय संघर्ष समितीचा लढा सुरू आहे. स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे या गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात हा परिसर येतो. याठिकाणी शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर आहेत. मात्र हा परिसर कल्याण लोकसभा मतदार संघात येतो. शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे तिथे खासदार आहेत. त्यामुळे या नाराजीचा फटका शिवसेनेला सहन करावा लागणार आहे.

आगरी मतं राष्ट्रवादीच्या पारड्यात?

या ग्रामीण भागात आगरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेवक बाबाजी पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. पाटील हे आगरी समाजाचे आणि स्थानिक उमेदवार आहेत. त्यामुळे आगरी समाजाची मते ही पाटील यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या नाराजीचा फायदा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -