घरदेश-विदेशमोदींचा पराभव केल्याशिवाय संविधान आणि लोकशाही वाचणार नाही - Sanjay Raut

मोदींचा पराभव केल्याशिवाय संविधान आणि लोकशाही वाचणार नाही – Sanjay Raut

Subscribe

2024 साली सोलापूरचे राजकीय चित्र पुर्णपणे बदलेले असेल, असे सूचक विधान संजय राऊत यांनी सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना केले आहे.

सोलापूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज सोलापूर दौऱ्यावर आहे. मोदींचा पराभव केल्याशिवाय या देशातील संविधान आणि लोकशाही वाचणार नाही, असे मोठे विधान संजय राऊत यांनी आज सोलापूरात माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच 2024 साली सोलापूरचे राजकीय चित्र पुर्णपणे बदलेले असेल, असे संकेतही संजय राऊतांनी यावेळी दिले.

प्रकाश आंबेडकर यांच्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, “सोलापूरचा विषय निघाला की, प्रकाश आंबेडकरांचा विषय येतो. गेल्या काही काळातील प्रकाश आंबेडकरांची व्यक्तव्य आणि त्यांच्या भूमिका काळजीपूर्वक पाहिल्या, तर स्पष्ट दिसेल की, बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या देशातील संविधानाचे रक्षण करण्यासाठी महत्वाची पाऊले उचलायची. या देशातील हुकूमशाही राजवट सुरू आहे. त्याविरोधात प्रकाश आंबेडकरांनी दंड ठोठावला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या कार्यक्रर्त्यांच्या बैठका, मेळावे आणि कार्यक्रम असतील, त्या प्रत्येक ठिकाणी प्रकाश आंबेडकरांची भूमिका स्पष्ट आहे की, मोदींचा पराभव केल्याशिवाय या देशात देशातील संविधान आणि लोकशाही वाचणार नाही. कारण या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे आजोबा आहेत.”

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाच्या यशात कमलनाथांचे मोठे योगदान; संजय राऊतांनी काँग्रेसला केले सावध

2024ला सोलापूरचे राजकीय बदलेल

संजय राऊत म्हणाले, “काल रात्री पुण्यामध्ये होतो. पुण्याच्या नाना पेठेत फार मोठी सभा झाली. अलीकडच्या काळता पुण्यात फार सभा होत नाहीत. मोदी देखील सभा घ्याईला धजावत नाहीत. पुण्यात शिवसेनेची फार मोठी सभा आणि लोकांचाय उत्साह फार आपण पाहिला. सभेला येणारे आणि ऐकणारे तर महाराष्ट्रातील चित्र जे आहे. राज्यातील जनतेचा कल जो आहे. तो स्पष्टपणे त्यांचा रोष हा दिसून येतो. सोलापूराची मला काय कल्पना नाही. आता तुम्हीच मला सांगायला पाहिजे. पण या वेळाला 2024 साली सोलापूरचे राजकीय चित्र पुर्णपणे बदलेले असेल. या विषय माझ्या मनात शिंका नाही. आम्ही मुंबईत बसून सोलापूरची माहिती घेत असतो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -