घरमहाराष्ट्रCorona : राज्यात आज कोरोनाच्या 154 रुग्णांची नोंद तर दोघांचा मृत्यू; JN 1...

Corona : राज्यात आज कोरोनाच्या 154 रुग्णांची नोंद तर दोघांचा मृत्यू; JN 1 व्हेरियंट रुग्णांची संख्या शंभरच्या वर

Subscribe

मुंबई : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रभाव कमी झालेला आहे. परंतु, त्याच्या वेगवेगळ्या व्हेरियंटमुळे नागरिकांच्या मनात भीती कायम आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. राज्यात आज कोरोनाच्या 154 नव्या रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर JN 1 व्हेरियंट रुग्णांची संख्याही शंभरच्या वर गेली आहे. (Corona 154 new cases registered in state today The number of JN 1 variant patients is over a hundred)

राज्यात आज दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या 154 झाली असून 172 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र आज राज्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.17 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यू दर हा 1.81 टक्के इतका आहे. तसेच JN 1 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या आज 139 वर गेली आहे. आज कोरोनाच्या 14,790 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 2,421 इतक्या आरटीपीसीआर चाचण्या होत्या, तर 12,369 इतक्या चाचण्या या RAT चाचण्या आहेत. राज्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा 1.04 टक्के इतका आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 11 कोटींचा धनादेश सुपूर्द

पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे  केंद्र सरकारने आधीच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहे. पुण्यात एकूण 91 रुग्ण असून त्या खालोखाल नागपूरमध्ये 30 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल ठाण्यामध्ये 5, बीडमध्ये 3, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 आणि नांदेडमध्ये 2 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

देशात JN.1 च्या रुग्णसंख्येत वाढ

देशात नव्या वर्षातही JN-1 प्रकारांच्या संख्येत झालेली वाढ पाहता केंद्राने राज्यांना केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या कोविड-19 च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. JN-1 प्रकाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने सर्व रुग्णालयांना इन्फ्लूएंझासारखा आजारावर आणि श्वसनाच्या आजारावर लक्ष ठेवण्यास तसेच अहवाल देण्यास सांगितले आहे.

हेही वाचा – Baramati Agro : रोहित पवार यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ ओबीसी सेलचे केंद्र सरकार विरोधात मूक आंदोलन

राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

दरम्यान नव्या कोरोना व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लवकरच औषधोपचारासंदर्भात टास्क फोर्स क्लिनिकल प्रोटोकॉल जाहीर करणार आहेत. तुमची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. फक्त काळजी घ्या आणि स्वत:हून आपल्याच घरी विलगीकरण स्वीकारा. खास करुन घरामध्ये वृद्ध लोक असतील तर मास्क वापरा. तसेच, दोन व्यक्तींमध्ये आवश्यक अंतर ठेवा, असा सल्ला कोविड टाक्स फोर्सने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -