घरताज्या घडामोडीCoronavirus: सॅनिटायझर, मास्क कशाला?...फक्त हे करा; मुंढेंचा सल्ला

Coronavirus: सॅनिटायझर, मास्क कशाला?…फक्त हे करा; मुंढेंचा सल्ला

Subscribe

नागरिकांनी करोनाला घाबरुन जाण्याची गरज नाही. हात वारंवार स्वच्छ धुणे तसंच सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं असल्याचं तुकाराम मुढेंनी म्हटलं आहे.

राज्यात नागिकांनी करोना विषाणूचा घसका घेतला आहे. राज्य सरकारने करोनाबाबत कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले आहे. गरज असेल तरच मास्कचा वापर करा असे आवाहन केले आहे. मात्र, करोना विषाणूपासून बचाव व्हावा म्हणून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मास्क आणि सॅनिटायझर मेडिकलमधून विकत घेतले आहेत. यावर आता नागपूर महापालिकेचे आयुक्त आणि सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सॅनिटायझर, मास्कच्या फंद्यात पडू नका, असे आवाहन केले आहे. त्यांनी करोनापासून बचाव करण्यासाठी काही टीप्स दिल्या आहेत.


हेही वाचा – करोना व्हायरस : हातावर स्टॅम्प मारलेल्या चौघांना पालघरमध्ये ट्रेनमधून उतरविले

नागरिकांनी करोनाला घाबरुन जाण्याची गरज नाही. हात वारंवार स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे तुकाराम मुढेंनी म्हटले आहे. करोनापासून बचाव व्हावा म्हणून मास्कची गरज नाही. मी मास्क वापरलेले कधी दिसले का तुम्हाला? त्याची गरजच नाही आहे. मास्क वापरल्यानंतर तुमच्या हाताची हालचाल जास्त होते. तुम्ही सारखा चेहऱ्याला हात लावत राहता. त्यामुळे तुमच्या हाताचा स्पर्श झाल्याने संसर्ग होण्याची शक्यता आहे. मास्कची गरज ही रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफला आहे. इतरांना मास्कची गरज नाही, असे मुंढे म्हणाले. यासह मुंढेंनी सॅनिटायझरबद्दल मार्गदर्शन केले आहे. महागडे सॅनिटायझर वापरण्या ऐवजी साबणाचा वापर करा. साबणाने हात वारंवार स्वच्छ धुवा. तसेच करोना पॉझिटीव्ह रुग्णांपासून ३ फूटाच्या अंतरावर उभे रहा. कराण हा विषाणू ३ फूटापर्यंत जगू शकत नाही, असे मुंढे म्हणाले.

- Advertisement -

सोशल मीडियाच्या माध्यमातून करोनाबाबत अफवा पसरवण्यात आल्या आहेत. लोकांनी करोनापासून बचाव व्हावा म्हणून महागडे सॅनिटायझर आणि मास्क विकत घेतले आहेत. महागड्या सॅनिटायझरऐवजी साबणाने हात स्वच्छ धुतले तरी करोनापासून दुर राहता येते, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -