घरमहाराष्ट्रसोलापूर विद्यापीठ नामांतर कार्यक्रमात गोंधळ; सुभाष देशमुखांविरोधात घोषणाबाजी

सोलापूर विद्यापीठ नामांतर कार्यक्रमात गोंधळ; सुभाष देशमुखांविरोधात घोषणाबाजी

Subscribe

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विद्यापीठाच्या नामांतरासाठी काहीच प्रयत्न केले नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली.

सोलापूर विद्यापीठाचे नाव अखेर बदलण्यात आले आहे. या विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. अखेर काल मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करुन त्याला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यात यावे या मागणीला मंजुरी देण्यात आली. मंजूरी मिळाल्यानंतर आज सोलापूर विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामांतर करण्यात आले. नामांतरावेळी धनगर समाजाने पारंपारिक पध्दतीने वाजतगाजत जल्लोष केला. या कार्यक्रमावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या भाषणावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. या नामांतर कार्यक्रमाला जलसंधारमंत्री राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खासदार विकास महात्मे आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. मात्र सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली.

देशमुखांनी काहीच प्रयत्न केले नाहीत

या नामांतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी सहकारमंत्री सुभाष देशमुख होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यक्रमाच्या भाषणावेळी असे म्हटले की, सर्वांच्या प्रयत्नांमुळे अखेर विद्यापीठाचे नामांतरण होत आहे. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत त्यांचे भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुभाष देशमुखांनी भाषण थांबवले नाही. विद्यापीठाच्या नामांतरासाठी सुभाष देशमुख यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. मग ते सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे नामांतरासाठी मंजूरी मिळाले असे कसे बोलू शकतात. तसंच ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष कसे असू शकतात, असा सवाल करत धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घातला.

- Advertisement -

हेही वाचा – 

आचारसंहितेपूर्वी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घोषणांचा पाऊस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -