घरमुंबईआला डास लांबला प्रवास!

आला डास लांबला प्रवास!

Subscribe

मुंबईवरुन दिल्लीला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाला डासांमुळे तब्बल एका तासाचा 'लेटमार्क' लागल्याची घटना घडली आहे.

विमानातील कॉकपिटमध्ये पायलटशिवाय दुसऱ्या कुणालाही प्रवेश करता येत नाही. मात्र जेट एअरवेजच्या विमानामध्ये कॉकपिटचा ताबा चक्क एका घुबडाने घेतल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा जेट एअरवेजचे विमान चर्चेत आले आहे. जेट एअरवेजचे मुंबईवरुन दिल्लीला जाणारे विमान एक तास उशीरा सुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. जेट एअरवेजचं (W 762 हे विमान मुंबईवरुन दिल्लीला जाण्यासाठी बुधवारी सकाळी सहा वाजता उडणं अपेक्षित होते. मात्र डासांमुळे विमान उडण्यास विलंब झाल्याचे समोर आले आहे.

डासांनी केला विमानाला ‘लेटमार्क’

जेट एअरवेजचं मुंबईवरुन दिल्लीला जाणारं विमान सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उड्डाण घेणार होत. याकरता पहाटे पाचच्या सुमारास प्रवाशांना चेक इन करण्यास सुरुवात झाली. परंतु विमानाच्या दरवाजातच डासांच्या झुंडींनी प्रवाशांचे स्वागत केले. मात्र विमानाच्या आता परिस्थीती ठिक असेल असा विचार करुन सगळे प्रवासी आपापल्या जागांवर विराजमान करण्यासाठी गेले. मात्र विमानाच्या आतमध्येही सगळीकडे डास असल्याचे समोर आले आहे. अखेर प्रवाशांनी याबाबत तक्रार केली असता केबिन क्रूने डास मारण्यासाठी बेगॉन स्प्रेचे फवारे मारले. तरीही डासांचे प्रमाण कमी झाले नाही. मग शेवटी जेटचे कर्मचारी डास मारायच्या रॅकेट घेऊन आले आणि त्यांनी रॅकेट्या सहाय्याने डासांचा समाचार घेतला. या सगळ्या धबडग्यात विमानाचं उड्डाण सहा ऐवजी सातच्या सुमारास झाले.

- Advertisement -

प्रवाशांचा संताप

जेट एअरवेजचं विमान दिल्लीच्या जवळ आल्यानंतर वैमानिकानं तशी कल्पना दिली आणि तुमचा प्रवास आनंददायी झाला असले अशी आशा व्यक्त केली. त्यावर सर्व प्रवासी हसू लागले आणि त्यांनी इतकी वर्ष विमान प्रवास करतोय पण डासांच्या झुंडी आणि त्यामुळे उड्डाणाला झालेला उशीर पहिल्यांदाच बघतोय अशी प्रतिक्रिया देत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.


वाचा – जेट एअरवेज विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट ऐवजी ‘घुबड’

- Advertisement -

वाचा – जेट एअरवेजवर आर्थिक संकट, कमी झाले शेअर्सचे भाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -