घरमहाराष्ट्रडोंबिवलीची पियाली तोष्णीवाल बनली मिसेस इंडिया युनिव्हर्स

डोंबिवलीची पियाली तोष्णीवाल बनली मिसेस इंडिया युनिव्हर्स

Subscribe

कल्याणची सुष्मिता सिंगने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिस टिन वर्ल्डचा किताब पटकावल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीकर पियाली जयेश तोष्णीवाल या महिलेने ‘मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१९’ आणि ‘मिसेस युनिव्हर्स मोस्ट पॉप्युलर’ हे किताब पटकावत डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या मिसेस इंडिया होममेकर्स संस्थेच्या सौंदर्य स्पर्धेतही पियाली ‘मिसेस महाराष्ट्र इंटरनॅशनल’ आणि ‘मिसेस क्वीन युनिव्हर्स (चॅरिटी)’ ठरल्या होत्या.

दिल्लीतील आयटीसी वेलकम हॉटेलमध्ये झालेल्या या स्पर्धेत देशातील २५ मोठ्या शहरांतील ६० स्पर्धक सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या या स्पर्धेमध्ये स्पर्धकांचे केवळ सौंदर्यच नव्हे तर व्यक्तीमत्व, बौद्धीक क्षमता, संवाद कौशल्य आदी गुणांचे परीक्षणही करण्यात आले. या नामांकित स्पर्धेवर आपला ठसा उमटवणाऱ्या पियाली तोष्णीवाल या कल्याण डोंबिवलीतील पहिल्या महिला स्पर्धक ठरल्या आहेत.

- Advertisement -

#aajkasuvicharPush yourself, because no one else is going to do it for you. ??

Piyali Guha Toshniwal ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜುಲೈ 12, 2019

सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या पियाली यांनी ट्रान्सजेंडर्सना सशक्त करण्यासाठी सुरू असणाऱ्या अनेक प्रकल्पात महत्वाची भूमिका निभावली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सौंदर्यवती स्पर्धेत त्यांनी मिसेस कल्याण क्वीनचा किताबही मिळवला आहे. फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये एमबीए केलेल्या पियाली यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि माध्यमिक शिक्षणामध्ये गोल्ड मेडलही मिळवले आहे. लागोपाठ २ नामांकित स्पर्धांमध्ये पियाली यांनी विजेतेपद मिळवल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

Piyali Toshniwal

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -