घरमहाराष्ट्रढाल तलवार मराठमोळी निशाणी, परफेक्ट काम झालंय; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

ढाल तलवार मराठमोळी निशाणी, परफेक्ट काम झालंय; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले, त्यानंतर आज ‘ढाल तलवार’ हे चिन्ह दिलं आहे. याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिंदे गटाने ‘तळपता सूर्य’ या चिन्हाला प्राधान्य दिले होते. मात्र ते चिन्ह न देता ‘ढाल तलवार’ हे चिन्ह दिले, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य आहे. ‘ढाल तलवा’र हे जुन्या शिवसेनेची निशाणी आहे. आपली बाळासाहेबांची शिवसेना आहे. मराठमोळी निशाणी आहे, परफेक्ट काम झालंय, असं ते म्हणाले.

ढाल तलवार पोहचवायची गरज नाही ही एक मराठमोळी निशाणी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची निशाणी, शिवाजी महाराजांची निशाणी आहे. त्यामुळे पोहचवायची काय गरज नाही, ती अगोदरचं पोहचली आहे. आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे त्यांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत. असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

ठाकरे गट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालं आहे

बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत असल्याने हजारो लाखो लाखो लोकं आमच्यासोबत येत आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्यांची शिवसेना आहे, सगळ्यांची शिवसेना आहे, कार्यकर्त्यांची शिवसेना आहे, पण ठाकरे गटं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाल्याची जहरी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -