घरमहाराष्ट्रउल्हासनगर : 'मृतकांच्या नातलगांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणार'

उल्हासनगर : ‘मृतकांच्या नातलगांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणार’

Subscribe

रविवारी उल्हासनगर येथे झालेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. या मृतकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवूण देण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

रविवारी उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ३ येथील मेमसाब इमारतीचा स्लॅब कोसळला. हा स्लॅब इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दवाखान्यावर कोसळला. दरम्यान, दवाखान्यामध्ये उपचारासाठी आलेले काही रुग्न या स्लॅबमध्ये दबले गेले आणि यात तिघांचा मृत्यू झाला. तर ८ रुग्ण जखमी झाले. यानंतर आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे उल्हासनगरातही क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन अंमलात आणण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त अच्युत हांगे, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, नगरसेवक सुरेंद्र सावंत, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, राजेंद्र साहू, संदीप गायकवाड, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, विधानसभा संघटक सागर उटवाल, तिरुपती रेड्डी, सुरेश सोनवणे, शिवाजी जावळे, दीपक साळवे आदी उपस्थित होते.

मृतकांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत

या दूर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये आर्थिक मदत करण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याचबरोबर या घटनेची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना दिले आहेत. या दूर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. तसेच दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश केले. या आदेशानंतर त्या रुग्णांना तातडीने क्रिटिकेअर या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही रुग्णांचा वैद्यकीय खर्च शिवसेना करणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -