घरदेश-विदेशEmployee News: नवनवीन आयडिया, result देणाऱ्या कर्मचाऱ्यांना यंदा 20 टक्के पगारवाढ

Employee News: नवनवीन आयडिया, result देणाऱ्या कर्मचाऱ्यांना यंदा 20 टक्के पगारवाढ

Subscribe

नाविन्यपूर्ण प्रयोग आणि अभिनव कल्पनांवर भर देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार असल्याचं मायकेल पेज इंडिया सॅलरी गाइड 2024 च्या अहवाल म्हटलं आहे.

नवी दिल्ली: मार्च संपताच पगारवाढीची सर्वत्र चर्चा होत आहे. जर तुम्हाला 2024 मध्ये तुमच्या पगारवाढीची काळजी वाटत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी वरिष्ठ पदांवरील पगारवाढ सरासरी 20 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Employee News New idea 20 percent salary hike for result giving employees this year Michael Page India Salary Guide 2024)

मायकेल पेज इंडिया सॅलरी गाइड 2024 नुसार, पारंपरिक उद्योगांमध्ये पुन्हा भरतीचे प्रमाण वाढत आहे, विशेषत: उत्पादन आणि ऑपरेशनल भूमिकांच्या सततच्या उच्च मागणीवरून हे स्पष्ट होते. याव्यतिरिक्त, विविध क्षेत्रांमध्ये डेटा विश्लेषण, जनरेटिव्ह एआय आणि मशीन लर्निंगमध्ये कुशल व्यावसायिकांची गरज वाढत आहे. वार्षिक मार्गदर्शन अहवालात BFSI, अभियांत्रिकी आणि उत्पादन, वित्त आणि लेखा, आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान, मानव संसाधन, खरेदी आणि पुरवठा साखळी, मालमत्ता आणि बांधकाम, विक्री आणि विपणन आणि तंत्रज्ञान या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.

- Advertisement -

नाविन्यपूर्ण प्रयोग आणि अभिनव कल्पनांवर भर देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार असल्याचं मायकेल पेज इंडिया सॅलरी गाइड 2024 च्या अहवाल म्हटलं आहे.

54 टक्के नोकरदार संधीच्या शोधात

नोकरी करत असणारे करिअरच्या नव्या संधी, अधिक वेतनाची नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु देशातील तब्बल 54 टक्के कामगारांनी सध्या हातात असलेल्या नोकरी टिकवून ठेवतानाच करिअरच्या नव्या संधी शोधण्यास प्राधान्य दिलं आहे. नेटवर्किंग संस्था अपनाडॉटको यांनी केलेल्या पाहणीतून हे समोर आले आहे.

- Advertisement -

कोणत्या क्षेत्रात किती पगारवाढ अपेक्षित (Salary hike)

अहवालात नमूद केल्यानुसार आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ज्युनिअर कर्मचाऱ्यांचा 35-45 टक्के तर माध्यम स्तरावरील अधिकाऱ्यांची 30-40 टक्के आणि उच्च व्यवस्थापनासाठी 20-30 टक्के पगार वाढीची मर्यादा ठेवली जाऊ शकते. तसंच मालमत्ता आणि उत्पादन क्षेत्रात ज्युनिअर कर्मचाऱ्यांसाठी 20-40 टक्के, मध्यम स्तरातील अधिकाऱ्यांसाठी 25-45 टक्के आणि उच्च अधिकाऱ्यांसाठी 20-40 टक्के पगारवाढ अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -