घरमहाराष्ट्रनाशिकमाजीमंत्री जैन यांच्यासह ३९ आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी

माजीमंत्री जैन यांच्यासह ३९ आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी

Subscribe

जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणातील शिक्षा झालेल्या माजीमंत्री सुरेश जैन यांच्यासह 39 आरोपींना मंगळवारी (दि. ३) नाशिक येथील कारागृहात हलवले आहे. माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह दहा जणांना उपचारासाठी हिरे वैदयकीय महाविदयालयात दाखल करण्यात आले आहे. जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणातील सर्व आरोपींनी निकालाला आव्हान देण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू आहे.

धुळे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांनी जळगाव घरकूल घोटाळाप्रकरणात माजीमंत्री सुरेश जैन व गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व आरोपींना दोषी धरत सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर या आरोंपींना धुळ्याच्या कारागृहात रवाना केले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव दहा जणांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. येथे चोख बंदोबस्त लावला आहे. वॉर्ड क्रमांक 33 मध्ये पाच महिलांवर उपचार सुरू आहेत. यात लता भोईटे, अलका लडडा, साधना कोगटा, मीना वाणी आणि सुधा काळे यांचा समावेश आहे. वॉर्ड 35 मध्ये शिवचरण ढंडोरे, माजीमंत्री गुलाबराव देवकर आणि सदाशिव ढेकळे यांना ठेवले असून, विजय कोल्हे यांना देखील वार्ड 17 मधून उपचार केल्यानंतर अन्य वार्डात हलवले आहे.

- Advertisement -

दरम्यान, उर्वरीत आरोपींना मंगळवारी दोन मोठ्या पोलीस वाहनांमधून नाशिक कारागृहात हलवले आहे. धुळ्याच्या कारागृहात 21 वर्षापावेतो शिक्षा झालेल्या आरोपींनाच ठेवण्यात येत असल्याने घरकूल घोटाळा प्रकरणातील आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलवण्यात आले आहे. यावेळी कारागृहाच्या बाहेर मोठी गर्दी गोळा झाली होती. नातेवाईकांनी आरोपींना भेटण्यासाठी प्रयत्न केला; परंतु बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. या आरोपींमध्ये माजीमंत्री सुरेश जैन यांच्यासह प्रदीप रायसोनी, राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी यांचा देखील समावेश होता.यावेळी बघ्यांची गर्दी पांगवतांना पोलिसांना मोठा प्रयत्न करावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -