घरमहाराष्ट्रFarmers Suicide: सरकारचं दुर्लक्ष; वर्षभरात 3 हजारांहून अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

Farmers Suicide: सरकारचं दुर्लक्ष; वर्षभरात 3 हजारांहून अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

Subscribe

मागच्या सहा महिन्यांत 1 हजार 370 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर 2023 ते मार्च 2024 या काळात मृत्यूला कवटाळले आहे.

सोलापूर: देशभरात लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातही सर्वत्र निवडणुकीची धामधूम आहे. प्रत्येक नेता, कार्यकर्ता आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. असं, असताना मात्र बळीराजाकडे या राजकारण्याचं लक्षच नाही. मागच्या सहा महिन्यांत 1 हजार 370 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर 2023 ते मार्च 2024 या काळात मृत्यूला कवटाळले आहे. (Farmers Suicide ended life in October 2023 to March 2024 6 months farmers news crop failure)

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीनुसार जानेवारी 2023 ते मार्च 2024 या 15 महिन्यांत तब्बल साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी स्थिती मागच्या काही वर्षांची आहे.

- Advertisement -

अमरावती व छत्रपती संभाजीनगर येथे हे प्रमाण जास्त आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून 1 हजार 370 शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होते.

कारण काय?

राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या अपुरा पाऊस पडल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरीचे पाणी आटले असून ग्रामीण भागांमध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ज्यामुळे अनेक भागांमध्ये आता टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पण हे पाणी अपुरे असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. पण एकीकडे टँकरने होणारा पाणीपुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनात देखील पुरेसा नसल्याने शेतकऱ्याने शेतीसाठी कोणते पाणी वापरावे? किंवा शेतीसाठी कुठून पाणी आणायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

- Advertisement -

काही जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस पडल्याने उत्पादन घटले आहे, तर काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हाती आलेले पीक नष्ट झाले आहे. राज्यातील हवामा चक्र बदलत असल्याने शेतकरी नापिकी, अवकाळीमुळे वाया गेलेले पीक, शेतमालाला न मिळणारा बाजारभाव, शेती करण्यासाठी घेतलेले कर्ज यामुळे नैराश्येत गेला आहे. पण याशिवाय देखील शेतकऱ्यांच्या मागे मुलांचे शिक्षण आणि इतर घरगुती कारणे देखील नैराश्यात जाण्यासाठी आहेतच, त्याचमुळे शेतकरी कोणताही विचार न करता आत्महत्येचा मार्ग निवडून आपल्या जीवनाचा शेवट करत आहे. ज्यामुळे आता शेतकरी आत्महत्येची अधिकृत आकडेवारी समोर आल्याने बळीराजाच्या आत्महत्या थांबणार कधी? असा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.

(हेही वाचा: Lok Sabha : उत्तर मध्य मुंबईतून अजूनही उमेदवार बदलायचं असेल तर…; संजय राऊत असं का म्हणाले?)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -