घरमहाराष्ट्रमाहीम-वांद्रे रेक्लेमेशनमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना

माहीम-वांद्रे रेक्लेमेशनमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना

Subscribe

मुंबई – मुंबईतल्या माहिम वांद्रे खाडीलगत भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आग लागल्यामुळे त्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास माहिम वांद्रे रेक्लेमेशन खाडीलगत आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

- Advertisement -

आग भीषण असल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मात्र, जीवितहानीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आगीचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ पसरले आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -