घरमहाराष्ट्रमुंबईत GST घोटाळ्यातील पहिली अटक!

मुंबईत GST घोटाळ्यातील पहिली अटक!

Subscribe

अटक करण्यात आलेले व्यापारी मोदासिंग सोढा यांनी १० बनावट कंपन्या स्थापन केल्या असून, त्याद्वारे ४१५ कोटी रुपयांचे फक्त कागदी व्यवहार केले आहेत.

जीएसटीच्या पुणे झोनल युनिटने पुण्यातील एका व्यापाराला मुंबईमधून अटक केली. कोट्यावधीचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जीएसटी कायद्यांतर्गत पुण्यातून करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. अटक करण्यात आलेल्या व्यापाराचं नाव मोदासिंग पद्मसिंग सोढा असं असून, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे झोनल युनिटला मिळालेल्या माहितीनुसार, काही लोकांची चौकशी केली असता हे लोक जीएसटी नोंदणी करून त्याआधारे बनावट बिलांद्वारे खोटे इनपूट टॅक्स क्रेडिट निर्माण करत असल्याचा प्रकार समोर आला होता. याआधारे भरमसाट डेटाचे मोठ्याप्रमाणात विश्लेषण केल्यानंतर या रॅकेटमधील काही प्रमुख व्यक्तींची नावंही समोर आली. याआधारावर पुणे आणि मुंबईमध्ये विविध ठिकाणी छापे देखील टाकण्यात आले होते. या कारवाई दरम्यान सोढा यांना अटक करण्यात आली.


अटक करण्यात आलेले व्यापारी मोदासिंग सोढा यांनी १० बनावट कंपन्या स्थापन केल्या असून, त्याद्वारे ४१५ कोटी रुपयांचे फक्त कागदी व्यवहार केले आहेत. या संपूर्ण प्रकरणात सोढांनी एकूण ८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वस्तू न पुरवताच त्याबदल्यात देण्यात आलेल्या पावत्यांच्या आधारे हा घोटाळा करण्याकत आला असल्याची आणि त्याद्वारे काळा पैसा तयार केला जात असल्याची शक्यता, पुणे झोनल युनिटने व्यक्त केली आहे. दरम्यान, युमनिटच्या तपासणीमध्ये सोढांच्या या बनावट कंपन्यांकडून २ कोटी १८ लाख रुपयांचा जीएसटी जमा करण्यात आला. अशाप्रकरचे घोटाळे करुन सरकारची मोठी फसवणूक करणारं एक रॅकेट असून ते देशभरात पसरलं असल्याची माहिती, युनिटकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

दुर्देवी: दिवाळीसाठी जात होता घरी, गुटख्याने घेतला जीव

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -