घरमहाराष्ट्रपिंपरीत महिला पदाधिकाऱ्याच्याशी गैरवर्तणूक करणाऱ्याला अटक

पिंपरीत महिला पदाधिकाऱ्याच्याशी गैरवर्तणूक करणाऱ्याला अटक

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेच्या माजी शहराध्यक्षाने महिला पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी शिवसेनेच्या माजी शहराध्यक्ष बाजीराव लांडे याच्या विरोधात निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवसेनेच्या पीडित महिला पदाधिकाऱ्यांने फिर्याद दिली आहे. त्यानुसार निगडी पोलिसांनी आरोपी बाजीराव लांडे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी बाराच्या सुमारास इरफान सय्यद यांच्या जनसंपर्क कार्यलायत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. तेव्हा, सर्व कार्यकर्ते आपापली मतं मांडत होती. त्याचवेळी शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष लांडे हे आले, माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी हा मतदारसंघ भाजपा पक्षाला दिला आहे. शिवसेना पक्षाचे त्यांनी वाटोळे केले आहे, असं म्हणत माजी खासदारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

- Advertisement -

तेव्हा, फिर्यादी पीडित शिवसेना पदाधिकारी आरोपीला म्हणाल्या की, तुम्ही शिवीगाळ काही करू नका. तुम्ही तुमचे विचार मांडा असे म्हणताच आरोपी लांडे यांनी संबंधीत महिला पदाधिकारीला शिवीगाळ केली. सोबत असलेल्या महिलांना धक्काबुक्की करत फिर्यादी महिला शिवसेना पदाधिकाऱ्याला दोन कानशिलात लागवल्या. तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर उपस्थित महिलांनी लांडे यांना चोप दिल्याचं सांगण्यात येत असून त्यांना पोलीस ठाण्यात आणले होते. या घटनेप्रकरणी आरोपी लांडे याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -