घरमुंबईभिवंडीत प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

भिवंडीत प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

Subscribe

एकदा वापरण्यात आलेले प्लास्टिक (सिंगल युज) हे मानव जातीसह सर्वच सजीव प्राण्यांच्या जिवितास धोकादायक असून पर्यावरणच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे सिंगल युज प्लास्टिक बंदी ही आजच्या काळाची गरज आहे. आपले शहर प्लास्टिक मुक्त करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्याामुळे शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी विघटनशील प्लास्टिक बंदी गरजेची असल्याने प्लास्टिक थैलीचा वापरू नये, असे आवाहन आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी केले. भिवंडी शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी शहरात पदयात्रेद्वारे प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा आयुक्तांनी मंडई येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शुभारंभ केला. ही पदयात्रा पारनाका, ठाणगे आळी, कासार आळीमार्गे निघून शिवाजी चौक येथे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

असा संपन्न झाला कार्यक्रम

सकाळपासूनच शहरातील प्रत्येक प्रभागात रस्त्यावरील आणि दुकानातील प्लास्टिक गोळा करण्यात आले. हे प्लास्टिक गोळा करून शहराच्या सर्व प्रभाग समिती तसेच मुख्यालयात आपत्कालीन कक्ष येथे प्लास्टिक संकलन केंद्र स्थापन करण्यात आल्याने त्यात प्लास्टिक जमा करण्यात आले. जमा झालेल्या प्लास्टिकवर पुनर्रवापर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी एखाद्या कंपनीशी करार करण्याचा महापालिकेचा निर्णय होणार आहे. त्यामुळे भिवंडी शहर प्लास्टिक मुक्त होण्यासाठी हातभार लागणार आहे. यावेळी स्वभाव नाट्य मंडळाने स्वछता मोहीमेचे महत्व सांगणारे पथनाट्य तर सरस्वती विद्यालय नारपोली यांनी प्लास्टिक वापरू नये यावर पथनाट्य सादर केले. बचत गटातील महिलांनी बनविलेल्या कापडी व कागदी पिशव्या प्रदर्शन व विक्री करण्यात आली त्यातून प्लास्टिक वापरू नये हा संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शोएब मोमीन यांनी केले तर जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

- Advertisement -

‘या’ मान्यवरांचा कार्यक्रमात सहभाग

शिवाजी चौक येथील कार्यक्रमाच्या समारोपात आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर बोलत होते. यावेळी आयुक्तांनी उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांना प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली. याप्रसंगी व्यासपीठावर उपायुक्त दीपक कुरुळेकर, उपायुक्त आरोग्य नयना ससाणे, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, मुख्य लेखाधिकारी कालिदास जाधव, मुख्य लेखापरीक्षक काशीनाथ तायडे, नगररचनाकार श्रीकांत देव, आरोग्य विभाग सहायक आयुक्त डॉ. सुनील भालेराव, कार्यक्रम संघटक ईश्वर आडेप, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे,बाळाराम जाधव, सुनील भोईर, शमीम अन्सारी,सुदाम जाधव आदींसह पालिका अधिकारी आणि कर्मचारी, महानगरपालिका माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणविभाग शिक्षक वर्ग आणि विविध शाळांचे व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -