घरमहाराष्ट्रगडचिरोली नक्षलवादी हल्ल्यात पाटोद्याचे सुपुत्र तौसीफ शेख शहीद

गडचिरोली नक्षलवादी हल्ल्यात पाटोद्याचे सुपुत्र तौसीफ शेख शहीद

Subscribe

तौसीफ शेख हे बीडमधल्या पाटोदा शहरातील क्रांतीनगर भागातील रहिवासी होते. हा हल्ला होण्याच्या काही तास आधी त्यांचे कुटुंबियांसोबत बोलणे झाले होते.

महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील जांबुरखेडा गावामध्ये नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला. नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरंग स्फोटात १५ जवान शहीद झाले आहेत. यामधील तौसीफ शेख हा जवान बीड जिल्ह्यातला आहे. तौसीफ शेख हे बीडमधल्या पाटोदा शहरातील क्रांतीनगर भागातील रहिवासी होते. हा हल्ला होण्याच्या काही तास आधी त्यांचे कुटुंबियांसोबत बोलणे झाले होते. हा फोन त्यांचा शेवटचा ठरला आहे. त्यांनी फोनवर बोलताना आईला तू माझी काळजी करू नको. मी मजेत आहे. तू स्वत:च्या तब्येतीची काळजी कर’ असे सांगितले होते. पाटोदा शहरात ही बातमी कळताच संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.

गडचिरोलीमधील भूसुरुंग दुर्घटनेमध्ये शहीद झालेले तौसिफ शेख यांचं त्यांच्या आईसोबत आज सकाळी सव्वा अकरा वाजता फोनवर बोलणे झाले होते. ते आईला फोनवर सांगत होते की, आई तू माझी काहीच काळजी करु नकोस. मी मजेत आहे. तु स्वत:च्या तब्येतीची काळजी घे’ तौफिक यांचे फोनवरील हे बोलणे शेवटचे ठरले आहे. तौसिफ आरिफ शेख हे पाटोदा शहरातील क्रांतीनगर भागामध्ये त्यांचे कुटुंबिय राहतात. आरिफ शेख यांना ३ मुलं आहेत. त्यांच्यातील तौसिफ यांनी देशसेवेमध्ये सहभाग घेतला.

- Advertisement -

तौसीफ शेख हे २०१० साली गडचिरोली पोलीसमध्ये शिपाई पदावर भरती झाले होते . २६ एप्रिल २०११ साली त्यांची गडचिरोली जिल्ह्यात नियुक्ती झाली होती. त्यांना आपल्या कार्यकाळात मोठा पराक्रम गाजवला होता. तब्बल सहा वेळा नक्षलवाद्यांशी झुंज देत तीन वर्षातच त्यांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यांना पोलीस महासंचालकांनी पदक देऊन गौरविले होते. त्यानंतर पाटोदा शहरात त्यांचा मोठा सत्कार देखील करण्यात आला होता. तौसीफ शेख यांच्या घरी आई ,वडील, भाऊ,पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -