घरमहाराष्ट्रराज्यपाल कोश्यारी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपतीला

राज्यपाल कोश्यारी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपतीला

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम शिवसेना सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर करत असतात. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील मधूर संबंध लपून राहिलेले नाहीत. सोमवारी राज्यपाल कोश्यारी यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर राज्यपाल कृपाशंकर सिंह यांच्याही घरी गणपतीच्या दर्शनाला गेले होते.

मिलिंद नार्वेकर हे पाली हिल येथे राहतात. त्यांच्याच इमारतीत कृपाशंकर सिंह ही राहतात. राज्यपाल कोश्यारी हे नार्वेकर यांच्या घरी जाणार असल्याची माहिती बाहेर पडणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. त्यामुळेच राज्यपालांनी सकाळीच जाऊन नार्वेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन गप्पा मारल्या. मात्र, या भेटीची माहिती गोपनीय राहू शकली नाही.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून नार्वेकर यांच्या राजभवनावरील भेटी वाढल्या होत्या. राजभवन आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात समन्वय साधण्याचे काम नार्वेकर यांनी केले होते. नार्वेकर हे राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी इच्छूक आहेत. पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेच्या मुद्यावरून ठाकरे आणि राज्यपालांमध्ये वादाची ठिणगी उडाली होती. मुख्यमंत्री परीक्षा घेत नसल्याबद्दल कोश्यारी यांनी जाहीर मतही व्यक्त केले होते. त्यामुळे ठाकरे हे राज्यपालांची भेट घेणे टाळत होते, असे एका शिवसेना नेत्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -