घरमहाराष्ट्रगणेशोत्सवासाठी कोकणात गाईडलाईन्स आरतीसाठी फक्त चारजण एकत्र येण्यास मान्यता

गणेशोत्सवासाठी कोकणात गाईडलाईन्स आरतीसाठी फक्त चारजण एकत्र येण्यास मान्यता

Subscribe

कोकणातला गणेशोत्सव परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. पण असे असले तरीही कोकणात गणपतीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस प्रशासनाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार गणपतीच्या आरतीसाठी फक्त चारजण एकत्र येण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच गाईडलाईन्स पाळूनच कोकणवासीयांना गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन करावे लागणार आहे.

कोकणात अनेक गावात गणपती हे डोक्यावरुन आणण्याची परंपरा असून गावातील सर्व घरगुती गणपती एकत्र आणले जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदा गणपती आगमनादरम्यान गर्दी करू नका, असे आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे यांनी केले आहे.

- Advertisement -

गणपतीच्या आगमनासाठी गर्दी करू नका, एकमेकांच्या घरी जाणे, आरती करणे या गोष्टी टाळाव्यात. कोणीही आगमन अथवा विसर्जन मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन प्रविण मुंढे यांनी केले आहे. पोलिसांवर कायद्याचा बडगा उगारण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्या, असेही मुंढे म्हणाले.

कोकणातील गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जारी
१ सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी नाही.
२ घरगुती गणेश मूर्ती शक्यतो शाडूच्या असाव्यात.
३ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिमरित्या घरीच करावे.
४ सार्वजनिक गणेश मूर्ती जास्तीत जास्त चार व्यक्तीने वाहनातून जाऊन करावे.
५ सार्वजनिक गणपतीच्या आरतीसाठी जास्तीत जास्त चार लोक सोशल डिस्टन्सिंग ठेवून एकत्र येऊ शकतात.
६ घरगुती गणपतीच्या आरतीसाठी घरातील व्यक्तींनी सहभागी व्हावे.
७ पारंपरिक पद्धतीने एकमेकांच्या घरी जाणे टाळा.
८ आगमनासाठी गर्दी करू नका.
९ त्याशिवाय यंदा गणपती विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून मूर्तीचे संकलन केले जाणार आहे. विसर्जनासाठी प्रशासनाकडून पेंडॉलही उभे केले जाणार आहेत. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी आरती करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -