घरमहाराष्ट्रदीपक सावंत यांचा अखेर राजीनामा

दीपक सावंत यांचा अखेर राजीनामा

Subscribe

रविवारी दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. विधीमंडळाचा सदस्य नसल्याने कायद्यानुसार त्यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. आपलं महानगरने यासंदर्भातील प्रथम वृत्त प्रकाशित केल्यानंतर सगळ्यांचे लक्ष त्यांच्या राजीनाम्यावर लागून राहिले होते. त्यानंतर रविवारी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. शिवसेनेकडून गेली दोन टर्म मुंबई पदवीधर मतदार संघातून डॉ दीपक सावंत यांना उमेदवारी देत आमदरकी देण्यात आली होती. त्यानंतर सावंत यांची वर्णी राज्याच्या आरोग्य मंत्री म्हणूनही करण्यात आली होती, परंतु शिवसेनेच्या आमदारांची काम होत नसल्याचा आरोप करीत अनेक आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे यंदा शिवसेनेने यंदा मुंबई पदवीधर मतदार संघाची उमेदवारी सवांत यांना नाकारून पोतनीस यांना दिली. त्यामुळे सावंत हे सध्या विधिमंडळाचे सदस्य नसून, त्यांची मुदत ७ जुलै रोजीच संपली आहे.


वाचा: तर पवारांची ‘औलाद’ सांगणार नाही – अजित पवार

भारतीय संविधान १६४ (४) नुसार कोणताही मंत्री विधी मंडळाचा सदस्य असणे बंधनकारक आहे.त्या साठी त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. याबाबतचे प्रथम वृत्त दैनिक आपलं महानगरने आपल्या २ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या नियमानुसार सावंत यांना ७ जानेवारी पर्यंत विधिमंडळ सदस्य होणे गरजचे होत. ही मुदत सोमवारी संपत असल्याने सावंत यांनी रविवारी रात्री आपला राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिला असुन आता ते डॉक्टरीचा सराव करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबत सावंत यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -