घरमहाराष्ट्रसुरेश कलमाडी यांची प्रकृती स्थिर!

सुरेश कलमाडी यांची प्रकृती स्थिर!

Subscribe

प्राथमिक माहितीप्रमाणे कलमाडी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्यामुळे त्यांना काल अचानक चक्कर आली. 

केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना काल (रविवारी) दुपारी पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. काल दुपारच्या सुमाराच सुरेश कलमाडी अचानक चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांना त्वरित रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, सूत्रांनुसार आता सुरेश कलमाडी यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे. कलमाडी यांची तब्येत स्थिर असून, त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे कलमाडी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्यामुळे त्यांना काल अचानक चक्कर आली.


वाचा: पुणे तेथे काय उणे, लाचखोरीतही पहिले

सध्या कलमाडी यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना रुबी हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरील न्यूरोलॉजी विभागात शिफ्ट करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत कलमाडी यांची प्रकृती स्वस्थ असून त्यामध्ये सुधारणा होईल असं रुबी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

वाचा: राज ठाकरे, शरद पवारांमध्ये काय झाली चर्चा?

दरम्यान, सुरेश कलमाडी यांच्यावर राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले होतं. त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून कलमाडींचं निलंबन मागे घेतलं जाणार असल्याची चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात रंगते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -