घरमहाराष्ट्रमराठवाडाHeat Wave: नागरिकांनो सावधान! मुंबई, कोकणात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; तर विदर्भात...

Heat Wave: नागरिकांनो सावधान! मुंबई, कोकणात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; तर विदर्भात पावसाची शक्यता

Subscribe

राज्यातील अनेक भागात उष्णचा चटका वाढला आहे. त्यातच महाराष्ट्रात पुढील 24 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे.

मुंबई: राज्यातील अनेक भागात उष्णचा चटका वाढला आहे. त्यातच महाराष्ट्रात पुढील 24 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यातच कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. (Heat Wave Yellow alert in Mumbai Thane Konkan and chance of unseasonal rain in Vidarbha)

मुंबई अधिक तापणार

ठाणे, मुंबईत आज तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच कोकणातही आज उन्हाची झळ बसणार आहे. तसंच, कोकणातही उन्हाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात आज तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिला आहे. हवामान विभागाने ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी उप्षणेतचा यलो अलर्ट जारी केला आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये कमाल तापमानाच पारा अजूनही वाढताना दिसत आहे. पहाटे धुके, तर दुपारी उन्हाचा चटका, असं वातावरण सध्या मुंबईत अनुभवायला मिळत आहे. रविवारीही वातावरणात उष्णता कायम राहणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत मुंबईसह उपनगरातील तापमानात वाढ होणार आहे. मुंबईचा पारा 25 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आयएमडीने दिला आहे.

- Advertisement -

या ठिकाणी पावसाचा अंदाज

6 ते 7 मे रोजी मराठवाड्यातील नांदेड व लातूर जिल्ह्यांमध्ये एका दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. धाराशिवमध्ये 6,7 आणि 8 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व यवतमाळ, भंडारा या मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना तिन्ही दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अकोला सर्वाधिक तापतोय

राज्यात शनिवारी अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. येथे 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावतीत 43, मालेगावमध्ये 42, बुलढाणा, ब्रह्मपुरीत 40 आणि 43 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर 43.8, गडचिरोली, वर्धा आणि वाशिम 43.0 आणि नागपूर येथे 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

(हेही वाचा: Politics : काँग्रेसने पंतप्रधान मोदींना मौत का सौदागर म्हणणे योग्यच होते; प्रकाश आंबेडकरांची टीका)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -