घरमहाराष्ट्रडोक्यात पाटा घालून पत्नीची हत्या; पतीला अटक

डोक्यात पाटा घालून पत्नीची हत्या; पतीला अटक

Subscribe

पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे आपण तिची हत्या केल्याचं आरोपीने पोलिसांकडे कबूल केलं आहे.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. या प्रकरणातील आरोपी मेव्हणीच्या घरी गेला असता तिथे त्याने आपल्या पत्नीच्या डोक्यात पाटा घालून तिची हत्या केल्याचं तपासामध्ये समोर आलं आहे. प्रकाश धांडे असं या आरोपीचं नाव असून संगमनेर पोलीसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान प्रकाशने पोलीसांना दिलेल्या जवाबामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे आपण तिची हत्या केल्याचं त्याने कबुल केलं आहे. मृत महिला शांता धांडे यांनी प्रकाश यांच्यासोबत दुसरा विवाह केला होता. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली होती. हत्येपूर्वी प्रकाश आणि शांता श्रीगोंद्याला राहत होते. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये सतत भांडणं सुरु होती.

वाचा: 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या?


रविवारी रात्री हे दोघंही संगमनेर तालुक्यतील जवळे बाळेश्वर येथे आले होते. त्यांच्यासोबत शांताची बहीण कांता आणि तिचे पतीही होते. हे चारही जण शांताच्या घरी वास्तव्याला होते. रात्री २ च्या सुमारास सर्वजण घरात झोपले असताना अचानक शांताच्या किंकाळीचा आवाज आला. कांताने व तिच्या नवऱ्याने आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता त्यांना शांता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्या दोघांना शांताच्या मृतदेहाशेजारी मसाला वाटण्याचा पाटा रक्त लागलेल्या अवस्थेत दिसला. दरम्यान, त्यावेळी हत्या करणारा प्रकाश घरातून पळून गेला होता. ही सगळी बाब लक्षात येताच कांता व तिच्या नवऱ्याने घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तक्रारीनंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपी प्रकाश धांडेला अटक केली.


वाचा: कंगनाचा नवा चित्रपट ‘पंगा’, शुटिंगला सरुवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -