घरमहाराष्ट्रIsrael Hamas युद्धाचा परिणाम महाराष्ट्रातील द्राक्षावर; निर्यात थांबली, कारण काय?

Israel Hamas युद्धाचा परिणाम महाराष्ट्रातील द्राक्षावर; निर्यात थांबली, कारण काय?

Subscribe

मुंबई : इस्रायल आणि हमास (Israel Hamas war) यांच्यात सुरू असलेल्या युद्धात सातत्याने वाढ होत असून त्याचा परिणाम आता समुद्रापर्यंत पसरला आहे. समुद्र आता अनेक देशांसाठी नवीन युद्धभूमी बनला आहे. खरं तर, येमेनच्या इराण समर्थक हुथी बंडखोरांनी हमासला उघडपणे पाठिंबा दिला आहे आणि ते समुद्रातील अशा जहाजांना लक्ष्य करत आहेत, जे इस्रायलकडे जात आहेत किंवा त्या जहाजांचा इस्रायलशी काही प्रकारचा संबंध आहे. जहाजांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे सुएझ कालवा आणि लाल समुद्रातून होणारी वाहतूक बंद आहे. त्यामुळं भारतातून युरोपियन देशात होणारी द्राक्षांची निर्यात जहाज वाहतूक कंपन्यांनी थांबवली आहे. त्यामुळे आता इस्त्राईल आणि हमास युद्धाचा फटका महाराष्ट्रातील (Maharashtra) द्राक्ष (Grapes) निर्यातील बसला आहे. (Impact of Israel Hamas War on Grapes in Maharashtra Export stopped)

हेही वाचा – Pawar VS Kolhe : अमोल कोल्हेंनी अजितदादांचे Challange स्वीकारले; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिले प्रतिआव्हान 

- Advertisement -

महाराष्ट्र हे द्राक्ष उत्पादनात देशात अग्रेसर असलेलं राज्य आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं आणि मोठ्या प्रमाणावर इतर देशात द्राक्षाची निर्यातही केली जाते. मात्र आता इस्त्राईल आणि हमासमध्ये युद्धामुळे द्राक्ष निर्यातील ब्रेक लागला आहे. कारण सुएझ कालवामार्गे युरोप देशात जाण्यासाठी 7 हजार 200 किलोमीटरचे अंतर पार करण्यास 21 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र दोन्ही देशांमधील युद्धामुळे जर युरोप देशात नवीन केप ऑफ गुड होपमार्गे जायचे असेल तर हेच अंतर 19 हजार 800 किमी एवढे होते. म्हणजे युरोप देशात जाण्यासाठी किमान 34 ते 38 दिवस लागणार आहे. एवढ्या दिवसांमुळे द्राक्ष खराब होण्याची भिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असून ऐन द्राक्ष निर्यात हंगाम सुरु होण्याच्या तोंडावरच अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

सरकारने द्राक्ष निर्यातीवर तातडीने मार्ग काढावा

द्राक्ष निर्यात बंद झाल्यामुळे सरकारने यावर तातडीने मार्ग काढावा आणि परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अशी अपेत्रा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जर निर्यात झाली नाही तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्यचाी शक्यता आहे, तसेच द्राक्ष खराब होण्याची भीतीही शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तुम्ही पत्रकारच माझे तिकीट…; बारामती मतदारसंघाच्या निवडणुकीवर Supriya Sule यांनी केले भाष्य 

अडीच महिन्याहून अधिक काळ युद्ध सुरु

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अडीच महिन्याहून अधिक काळापासून युद्ध सुरु आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हजारो क्षेपणास्रांचा मारा करत युद्धाला सुरुवात केली. त्यानंतर हमासचा खात्मा करण्याासाठी इस्रायलही युद्धात उतरल. अडीच महिन्याहून अधिक काळ चाललेल्या या युद्धात दोन्ही देशांच्या युद्धात हजारो निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. हमासला लक्ष्य करण्यासाठी इस्रायलकडून गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -