घरमहाराष्ट्रपतपेढीमध्ये पैशाचा अपहार

पतपेढीमध्ये पैशाचा अपहार

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील पतपेठीत कोटींचा अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे. पतपेढीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच चुकीची गुंतवणूक केल्यामुळे हा अपहार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील आशापुरी पतसंस्थेने नियमबाह्य व बेकायदेशीर क्षेत्राबाहेर पतपेढ्यांमध्ये गुंतवणूक करून दीड कोटींचा अपहार झाला आहे. त्यामुळे आशापुरी नागरी पतसंस्थेच्या संचालकांसह तत्कालीन सहायक निबंधकासह १५ जणांविरुद्ध अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर ठेवीदारांमध्ये भितीचे वातारण आहे. पतपेठीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पतपेठीतील पैसे दुसऱ्या ठिकाणी गुंतवले असल्यामुळे पतपेढीला तोटा झाला. याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

कसा घडली घटना

अमळनेर येथील आशापुरी नागरी पतसंस्थेमध्ये १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ च्या काळात संचालक असलेले सुधाकर शंकर कोठावदे, योगेश नीळकंठ भोकरे, चुडामण केशव पाटील, यशवंत बुधा पवार, सचिन प्रभाकर कोठावदे, जनार्दन राजाराम कोठावदे, विजय मुरलीधर कोठावदे, रघुनाथ धोंडू कोठावदे, हरचंद नवल लांडगे, धिरेन प्रवीण जेठवा, भगवान हैबतराव जाधव, पुष्पाबाई पुंडलिक महाजन, छाया दिलीप कोठावदे, प्रमोद पुंडलिक कोठावदे, तसेच तत्कालीन सहायक निबंधक पी. एच. भामरे यांनी नियमबाह्य क्षेत्राबाहेरील पतसंस्थांमध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे ठेवीदारांचा पैसा अडकला. याप्रकरणी लेखा परीक्षक राजेश उत्तमराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -