घरताज्या घडामोडीNashik Mhada Scam: घोटाळ्यातील २०३१ घरं नाशिक म्हाडाला मिळाली, जितेंद्र आव्हाडांची माहिती

Nashik Mhada Scam: घोटाळ्यातील २०३१ घरं नाशिक म्हाडाला मिळाली, जितेंद्र आव्हाडांची माहिती

Subscribe

नाशिकमधील म्हाडा घोटाळ्याच्या प्रकरणात जास्तीचे घरे मिळाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून दिली आहे. नाशिकमध्ये २०१३ ते २०२२ पर्यंत १५७ घरे म्हाडाला मिळाली होती. यामध्ये काहीतरी घोटाळा आहे असे माझ्या ध्यानी येताच चौकशी सुरु केली. आजमितीपर्यंत २०३१ घरे म्हाडाला प्राप्त झाली आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. नाशिकमध्ये २०१३ ते २०२२ पर्यंत १५७ घरं म्हाडाला मिळाली होती. ह्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे, असे माझ्या ध्यानी येताच चौकशी सुरू केली. आजमितीपर्यंत २०३१ घरे म्हाडाला प्राप्त झाली आहेत आणि त्याची सोडत व लॉटरी मे आणि जून महिन्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती आव्हाडांनी दिली आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात म्हाडाला जवळपास सात हजार घरे मिळायला हवी होती, असा दावा यापू्र्वी करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष संख्या ही दीडशेच्या घरात होती. आता ही संख्या किमान पाच हजारावर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : गृहखात्याचा अजब कारभार, पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अवघ्या १२ तासांत स्थगिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -