घरमहाराष्ट्रमहिलेवर सामूहिक बलात्कार; महिलांचाही सहभाग

महिलेवर सामूहिक बलात्कार; महिलांचाही सहभाग

Subscribe

बलात्कार करणारे चारही आरोपी बेपत्ता असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

अमरावतीच्या भातकुली पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्याने गावाताली महिलेचे अपहरण करुन, तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकील आली आहे. धक्कादायक म्हणजे अपहरणापासून ते बलात्कारापर्यंतच्या या कटामध्ये 
पंचायत समितीचे अधीक्षक सचिन गुल्हाने आणि सय्यद राशिद तसंच गुल्हाने यांच्या पत्नीसह आणि अन्य एका महिलेचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाशी पीडिता रस्त्याच्या कडेल रिक्षाची वाट पाहत उभी होती. अचानक तिच्या जवळ एक गाडी येऊन थांबली आणि जबरदस्तीने तिला त्या गाडीमध्ये बसवण्यात आले. यावेळी गाडीमध्ये चारही आरोपी आधीपासूनच होते. पीडितेने आरडाओरड करु नये यासाठी तिला चाकूचा धाक दाखवण्यात आला. त्यानंतर गाडी सुसाट सुटली आणि काही वेळाने थेट जाऊन थांबली ते बडनेरा परिसरात. याचठिकाणी दोन्ही नराधमांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिल. पीडित महिलेने पोलिसांना सांगितल्यानुसार, चारही आरोपींकडून तिला बेदम मारहाण देखील करण्यात आली.

वाचा : भयंकर! आईनेच केला आपल्या बाळाचा खून

सदर प्रकार घडल्यानंतर चौघेही पीडितेला तिथेच सोडून पसार झाले. त्यांनतर काही तासांनी पीडित महिला कशीबशी बडनेराला पोहचली. बडनेराला पोहचताच पीडिता तक्रार नोंदवण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात पोहचली. मात्र, तिथे तिली फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात जायला सांगितले. त्यामनुसार, पीडिता फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गेली आणि तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर तिने चारही आरोपींविरोधात लेखी तक्रार नोंदवली. दरम्यान, महिलेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या चारही जणांविरुद्ध अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, सध्या हे चारही आरोपी बेपत्ता असून फ्रेजरपुरा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -