घरमहाराष्ट्रधनंजय मुंडे यांच्या कारखान्याची चौकशी केव्हा होणार?; किरीट सोमय्या यांचा सवाल

धनंजय मुंडे यांच्या कारखान्याची चौकशी केव्हा होणार?; किरीट सोमय्या यांचा सवाल

Subscribe

सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्याची चौकशी केव्हा होणार? असा सवाल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला.

मुंडे यांच्या जगमित्र साखर काराखान्यातील घोटाळ्याच्या विरोधात १४ जून २०१९ रोजी बीड पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्याविरोधात मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन तात्पुरती स्थगिती मिळवली होती. ती स्थगिती आता उठवली असून मुंडे यांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे निर्देश राज्य सरकारला न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

परिवहन मंत्री परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल कधी करणार? असा प्रश्न करताना सोमय्या म्हणाले की, लोकायुक्तांच्या सुनावणीत हे सिद्ध झाले आहे की मंत्री अनिल परब यांनी फसवणूक करून रत्नागिरी येथील समुद्र किनारी पंचताराकिंत रिसॉर्ट बांधले आहे. या अनधिकृत बांधकामाविरोधात केंद्रीय पर्यावरण खाते, हरित लवाद यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. याबाबत मी पाठपुरावा करणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -